Wednesday 11 April 2018

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता...


हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी “जिंजी”.* संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात जिंजीचे महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु आज पूर्ण पणे विस्मृतीत गेले आहे. जिंजीचा हा किल्ला मद्रासच्या दक्षिणेला २५० किलोमीटर दूर तीरूअण्णामलई पर्वतराजीत येतो. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये झाला आणि लगेच संपूर्ण दख्खन जिंकण्यासाठी औरंगजेब ५,००,०००/- सेना घेऊन दिल्लीतून निघाला. अत्याचाराची अघोरी मालिका आरंभ झाली.
दक्षिणेतली सारी राज्ये बुडवून एक छत्री मुगली सत्ता स्थापनेचा त्याचा उद्देश्य होता. मोगलांचे सैन्य हे त्याकाळच्या जगातले सर्वात मोठे सैन्य होते. घोडदळ व पायदळ मिळून एकूण ५ लाख सैन्य होते. अगणित हत्ती, तोफा व शास्त्रणाचा महापूरच जणू दक्षिणे वर लोटला.
पुढे संभाजी राजांना छळा बळाने ठार करण्यात आले हे तर सर्व ज्ञात आहेच. परंतु पुढे जो हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास लिहिला गेला तो दुर्दैवाने आज लुप्त पावला आहे. तो तेजस्वी इतिहास असा की….
औरंगी वरवंट्या खाली आदिलशाही आणि कुतुबशाही ही राज्ये बुडून नष्ट झाली, पण त्यांच्या पेक्षा सैन्यबळा मध्ये लहान असलेले हिंदवी स्वराज्य काही औरंग्या जिंकू शकला नाही. छत्रपतींच्या मृत्यू नंतर पुढची २७ वर्ष सतत मोगल सेनेला स्वराज्यने निकराची झुंज दिली, जे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य आहे कारण सतत २७ वर्ष युद्ध कोणत्याही राष्ट्राने आज वर लढलेले नाही ज्यामध्ये १ दिवस ही शांततेचा काळ नाही. शेवटी १७०७ मध्ये वैफल्यग्रस्त झालेला औरंगजेब मेला व स्वराज्याचा निर्णायक विजय झाला.
या २७ वर्षामध्ये (१६८० ते १७०७) संभाजी महाराजांच्या मृत्यू (१६८९) नंतरची १८ वर्ष तर फारच भीषण काळ घेऊन आली. जेव्हा राजाराम महाराज छत्रपती झाले. याच काळात रायगड पडून मोगलांच्या हाती लागला. रायगडा पासुन ते जिंजी पर्यंतचा प्रवास अत्यंत धोक्याचा होता. जागोजागी मोगल सेना पसरली होती. अशा परिस्थितीत राजाराम महाराजांना अनेक वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन या प्रवासा मध्ये सहाय्य केले. आता स्वराज्याची राजधानी रायगड हून खोल दक्षिणेत जिंजीला हलविली.
हिंदवी स्वराज्याच्या अद्वितीय पराक्रमा मुळे जिंजी जगाच्या इतिहासात विख्यात झाले ते “ट्रोय ऑफ ईस्ट” (Troy Of East) म्हणुन. याचा अर्थ औरंगजेबाने प्रयत्नांची शर्थ केली तरी तो जिंजी वर मत करून स्वराज्य बुडवू शकला नाही...
रायरीचा डोंगरी जगदीश्र्वरासमोर ह्या काळ्या पत्थरीच्या समाधी खाली सह्याद्रीचे-ह्या महाराष्ट्र देशीचे सार्वभौम राजे शिवराय कायमचे विसावले आहेत........ अखंड भारतवर्षाचं शक्तीपीठ बनलीय ही समाधी ............ सर्व जातीय-सर्व भाषीय लोकांचं इमान या एका जागी एकवटलयं........ वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्यासाठी चेतवलेलं स्फुल्लिंग वयाच्या पन्नासाव्या वर्षीपर्यत वणवा बनून कित्त्येक निर्दयी राजवटी संपवून इथेच विश्रांतीला थांबलं........ महाराज कायमच्या विश्रांतीसाठी थांबले तरीही त्यांनी उभारलेलं स्वराज्य तसूभरही डळमळलं नाही ........ ही ताकदही महाराजांचीचं "त्यांनी प्रत्येक मावळ्याच्या अंतर एक एक शिवराय जागवला होता............ "शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.......... "सह्याद्रीच्या अंगा-खांद्यांवर संजीवक नजरेने मोक्याच्या जागा हेरून तिथे बुलंद गडकोट वसवली होती........"। महाराजाच्या नुसत्या स्मरणाने अंगावर भाले फुटतात हे आजही आपल्या अंतरात शिवराय जिवंत याचंच द्योतक आहे......


संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला...
ग्रंथाचे नाव — बुधभुषणम.
संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले :- नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक...
.
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपतीनां साहिक्तिक आणि संस्कृत याची उत्तम माहिती होती. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे:
संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन...
.
• श्री गणेशाला नमन देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नम् ||
मराठी मध्ये अर्थ :- देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या, रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो...
.
• कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः | जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः |
मराठी मध्ये अर्थ :- कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास. तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास...
.
• भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
मराठी मध्ये अर्थ :- सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजीराजे होऊन गेले...




<

Tuesday 3 April 2018

अखंड स्फूर्तीचा झरा शांत झाला..

३ एप्रिल १६८०आजच्या दिवशी महातेजोनिधी शिवसूर्य मावळला.आपल्या अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमाची दखल घ्यायला भाग पाडणारे भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या इहलोकीची यात्रा संपवून अवघ्या सह्याद्रीला दुःखाचे चटके लावून कैलासास गेले.
अखंड स्फूर्तीचा झरा शांत झाला.
आपले जीवित तृणवत मानून इहलोकी परलोकी किर्तीरुपाने उरले.
भगवान छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आज पुण्यतिथी आजच्या या पुण्यतिथी दिनी महाराजांना शतशः नमन.
शिवरायांचे आठवावे रुप। शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप।भूमंडळी।।

आपण अनेकदा एक वाक्य वाचतो...
‘क्या लेकर आए थे, क्या लेकर जाओगे..’ आज पुन्हा ते आठवले.. विचारांचा वेग वाढला.. इतका की पुन्हा ४०० वर्षांपूर्वी मन परतले..

कसं असतं आयुष्य.. आपण कुणाच्या उदरी जन्म घेतो, कुणाशी आपली खुणगाठ बांधली जाते, कोण आपले होते, कोण परके रहाते, आपले व्यवहार, आपले आचार, आपले विचार कसे घडतात?

सामान्य आयुष्य जगत असतांना एक ध्येय मिळते आणि मग ती विचारांची ठिणगी अख्खे आयुष्यच बदलून टाकते. एक न संपणारा प्रवास सुरु होतो आणि आपले विहित कर्म केल्याबरोबर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागते जसे आलो तसेच.. काहीही न घेता.. मग आयुष्यभर जो खटाटोप माणूस करतो तो कशासाठी? षडरिपुंच्या आहारी जाऊ नये हे माहित असूनही का आपण जातो? जन्म-मृत्यूचा खेळ माहित असूनही आपण का एखादा ध्यास घेऊन पळत असतो?

समाजात ध्येयासक्त माणसांना कधीतरी निरखून पहा. ते गर्दीत वावरत असले तरीही आपल्याच विश्वात रममाण असतात. मोजके आयुष्य आहे हे माहित असते आणि त्यात भले करावे हा एकंच ध्यास असतो. काही लोक आपली प्रतिष्ठा चिरकाल राहावी यासाठी दानधर्म करतात, काही निव्वळ पैसा कमावतात, काही सामाजिक क्षेत्रात समाजोपयोगी कार्य करण्यात, समाजाचे दु:ख दूर करण्यात गुंतून जातात.

हा ध्यास, हे उद्धिष्ट, हे विचार, ही तंद्री कशी लागते? संसारात असूनही राष्ट्रहिताचे कार्य ‘राष्ट्र प्रथम’ या निष्ठेने कसे करता येते? अगदी कित्येकदा घरच्यांचा विरोध पत्करून, अनेक भावनिक आणि मानसिक पाश तोडून ही माणसे ध्येयवेड्या जीवनाची कास कशी धरतात? मग ते कुटुंबावर अन्याय करतात का? हो पण आणि नाही पण. एका कुटुंबासाठी दुसऱ्या कुटुंबाचा सर्वस्वी त्याग करणे किंवा त्याच्यासाठी आपले जीवन समर्पित करणे.. ही कुटुंबं म्हणजे एक वैयत्तिक आणि दुसरे.. ‘वसुधैव कुटुंबकम’.. सारे विश्वाच आपले कुटुंब आहे, त्याला आपली गरज आहे आणि ती गरज ओळखून स्वत:ला झोकून देऊन आपापल्या क्षेत्रामध्ये ती कार्यमग्न होतात.
काहींना प्रसिद्धी मिळते काहींना नाही. पण त्याची पर्वा करणारे ध्येयवेडे होऊच शकत नाहीत आणि जे पर्वा करीत नाहीत ते मृत्युनंतरही अमर राहतात.

मृत्यूचे भय तुम्हा आम्हा सारख्या सामान्य माणसांना.. आपल्यावर आपले एक कुटुंब निर्भर असते. मात्र तरीही काळाचा आघात हा प्रत्येकाला कधी न कधी सहन करावा लागतो. आपण कितीही देव मानीत असलो तरी भगवान श्रीकृष्णांना सुद्धा मानव अवतारात मृत्यूला शरण जावे लागलेच. जो जो जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ आहे. तो निसर्गनियम आहे त्याला कुणीही बदलू शकत नाही..

‘मौत ने ज़माने को ये समा दिखा डाला
कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला
याद रख सिकन्दर के हौसले तो आली थे
जब गया था दुनिया से दोनो हाथ खाली थे’

नैसर्गिक मृत्यू आणि मानवाने केलेले आघात यात नैसर्गिक मृत्यू माणूस स्वीकारेल. पण मानवाने केलेले आघात मात्र पिढ्यानपिढ्या चालत राहतात. कत्तली होत राहतात. षडरिपूंमधले क्रोध, अहंकार त्याला कारणीभूत ठरतात. अनेक वीर योद्धे, देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्यांना सतत अशा गोष्टींना बळी पडावे लागते. कितीही ‘अखंड सावध’ असले तरीही आपलेच घात करणारे असतात हे मात्र विसरून चालत नाही. आणि अशावेळी मात्र अतोनात यातनांशिवाय काही काही उरत नाही.

जिवंतपणी माणसांचा छळ करणे आणि त्यांच्या मृत्युनंतर देवत्व बहाल करून त्यांचे गोडवे गाणे याउपर असंवेदनशील असे काहीच नाही. संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांना अनेक वेदनांना सामोरे जावे लागले, संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली गेली अशी अनेक उदाहरणे या संतांविषयी देता येतील. राजपुतांच्या इतिहासात तर पिढ्यांनपिढ्यांचे हाडवैर सतत होते. महाराणा प्रतापांनी राजा मानसिंग यांच्यासोबत भोजन नाकारले म्हणून क्रोध, पृथ्वीराज चौहान राजा जयचंद यांच्या भेटायला गेले नाहीत म्हणून चक्क राजा जयचंदने शाहबुद्दीन घोरीला निमंत्रण देऊन पृथ्वीराज चौहान यांच्यावर आक्रमण करविले, राजा मारवर्मन कुलशेखरच्या मृत्युनंतर त्याच्या वीरवर्मन आणि जटावर्मन या मुलांमध्ये सत्तेवरून संघर्ष होऊन जटावर्मनने आलौद्दिन खिलजीचे सहाय्य आपल्या भावाविरुद्ध मागितले. म्लेन्छ भारतात आलेच ते मुळी सत्तास्थापन करण्याची असुरी महत्वाकांक्षा घेऊन. त्यांच्या इतिहासात तर गादीवरून सर्रास कत्तली होत. अगदी आपल्या बापाला पण सोडत नसत. मात्र त्याही उपर सत्तालोलुप ठरली ती आपलीच माणसे..

मांसाहेब जीजाऊ यांच्या वडिलांना लखुजी जाधवराव यांना व त्यांच्या सर्व पुत्रांना बादशाही दरबारात निघृण मारले गेले, छत्रपती संभाजी राजांना पण आपल्याच आप्तेष्टाने फितुरी करून पकडून दिले, तीच परिस्थिती शहाजी राजांची..

आज समाजासाठी कुणी काम करत असेल तर त्यालाही या अतोनात वेदनांतून जावेच लागते. आपल्या पुण्याचा तरुण तडफदार युवक अधिक कदम यांनी काश्मीर येथे अतिरेक्यांच्या गोळ्या झेलल्या तरीही तिथल्या अनेक आश्रित मुलींसाठी तो सतत कार्यरत आहे.. आजही. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्री. गोविंद पानसरे यांनी लोकहितासाठी कार्य हाती घेतले त्यांची दिवसाढवळ्या कत्तल केली गेली. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या जीवाचे रान करून कार्य करणारी मंडळी आहेत. मात्र समाज कंटकांना कधीच चांगले पाहवत नाही हे आपल्या समाजाचे दुर्दैव.

हे सगळे आणि आजचीही परिस्थिती पाहिली की वाटते का? कुणासाठी? कशासाठी हा देह झिजवावा? परकीय समोरून तरी वार करतात, आप्तेष्टांचे वार मात्र हृदयाच्या आरपार जातात.

छत्रपती शिवरायांना कमी शत्रू नव्हते.. उलट आपलीच जास्त माणसे त्यांची शत्रू होती. आज आपण छोट्याशा वादाला कंटाळतो, व्यापारात failure ला घाबरतो, परीक्षेत कमी मार्क पडले, नोकरी मिळाली नाही, गृहकलह, हाती घेतलेल्या कार्यात यश मिळत नाही म्हणून खचून जातो. आपण success stories ने प्रेरित होतो पण त्या successच्या पाठीमागचे ‘mental determination’ आणि कष्टप्रद मार्ग विसरतो. दिसतो तो final verdict ‘successful’.

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद हे थोर पुरुष फक्त अल्पकाळ जगले आणि देशासाठी ठोस काहीतरी करून गेले.
छत्रपती शिवरायांचे जीवन हा एक खडतर पण प्रेरणादायी प्रवास आहे. त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन आज अनेक पिढ्या घडताहेत. अगदी छोटासा अंश जरी त्यांच्या आदर्शांवर जगू शकलो तरी धन्य धन्य वाटते.
महाराज अजून जगायला हवे होते.. आपल्या देशाचा इतिहास, भूगोल सारेच बदलले असते. आयुष्याच्या अंत:काळात त्यांच्या मनात काय आले असेल यावर एक मन हेलावणारे गीत शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव कार्यक्रमात आहे. महाराजांच्या अंत:समयी त्यांना कोण यातना झाल्या असतील, त्यांच्या स्वप्नांचा ध्यास याची व्याप्ती आजही पूर्ण होऊ शकली नाहीये.. खूप खूप करायचे आहे.. घडवायचे आहे.. तोपर्यंत त्यांचा आत्मा त्या रायगडाच्या कुशीत तळमळत राहील..

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही...

तो ध्येयासक्त राहतो.. चिरकाल... पद्मश्री राव, सईशा फौंडेशन मुंबई

Thursday 29 March 2018

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ

शिवकालीन अष्टप्रधानमंडळ शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.

पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.

पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणार्‍य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली जाई. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रीपद देण्यास महाराजांचा विरोध होता.

Tuesday 27 March 2018

घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो

बाजी प्रभू देशपांडे हे मराठ्यांचे शूर योद्धे होते. पावनखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत पावनखिंड रोखून धरली.
बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. शिवाजीराजांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली.सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी, आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन विजापूरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना १३ जुलै, इ.स. १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे. घोडखिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.

Saturday 24 March 2018

पुरंदरच्या तह : ( शक्ती आणि युक्ती " हे राज्य व्हावें ही श्रींची इच्छा !"


पुरंदरच्या अभूतपूर्व लढ्यानंतर, पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजे व शिवाजीमहाराज यांच्यात पांच कलमांचा तह झाला; तो शिवइतिहासात 'पुरंदरचा तह' म्हणून प्रसिध्द आहें. महाराजांनी आपल्या शत्रूंशी (स्वकीय व परकीय) अनेक तह केले; पण तें फारसे प्रसिध्द नाहीत व कोणाला त्या बद्दल फारशी माहितीहि नाही. पण पुरंदरचा तह मात्र प्रसिध्द झाला; कारण या तहामुळेच महाराजांच्या पराभवावर (व मिर्झाराजांच्या विजयावर) शिक्कांमोर्तब झाले, ... पण हें सत्य नव्हे !

पुरंदर तहातील जी पांच कलमे आहेत, ती सर्व दोषपूर्ण आहेत व त्यातील एकही कलम अर्थपूर्ण नाही, म्हणून त्याला 'पुरंदरचा पोकळ तह' म्हणायला हवे !!

पुरंदरचा पोकळ तह :

या प्रकरणांत आपण पुरंदरच्या पहिल्या व दुसऱ्या कलमांचा विचार करू या. दुसरे कलम सर्वात फसवे आहें.

आकड्यांचा खेळ :

महाराजांनी २३ किल्ले (म्हणजे ६६ %) व ४ लाख होन वसूलाचा मुलूख (म्हणजे ८० %) बादशहाला दिला, तर उरलेले १२ किल्ले व त्याखालील १ लाख होन वसूलाचा मुलूख त्यांच्याकडे राहीला.



पुरंदरच्या प्रसिध्द तहांतील कलमे पांच, ती पुढील प्रमाणे, --

१. पुरंदर, वज्रगड, कोंढाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग, पळसखोल, रूपगड, बख्तगड, मोरबखन, माणिकगड, सरूपगड, साकरगड, मरकगड, अंकोला, सोनगड व मानगड हें तेवीस किल्ले व त्यांच्या अमलांतील चार लाख होनांचा मुलूख शिवाजीराजांनी बादशाहांच्या स्वाधीन करावा.

२. शिवाजीराजांनी फक्त बारा किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा त्यांखालील मुलूख यावर संतुष्ट राहावे. हा मुलूखहि केवळ बादशाही कृपेचा प्रसाद म्हणूनच त्यांच्याकडे राहू शकत आहे, हें लक्षात घेऊन त्यांनी बादशहांशी अत्यंत निष्ठेने वागावे.

३. शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे यांना बादशहांकडून पांच हजार स्वारांची मनसब मिळेल. पण संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकर यांनी दख्खनच्या सुभेदारापाशी चाकरीस राहावे



४. दख्खनचा शाही सुभेदार जेव्हा जेव्हा हुकूम करील तेव्हा तेव्हा शिवाजीराजांनी सुभेदाराच्या हुकूमाप्रमाणे कामगिऱ्या पार पाडाव्यात.

५. विजापूरकरांच्या अमलांतील तळ-कोंकणचा व बालेघाटावरचा मुलूख जिंकून घेतल्यानंतर शिवाजीराजांच्या ताब्यांतच ठेवण्यास बादशाहांची मंजुरी आहे. त्याबद्दल शिवाजीराजांनी दरसाल तीन लाख होनांच्या हप्त्याने एकूण चाळीस लाख होनांची पेशकश बादशाहांस द्यावी.

इतिहासकार सर सेतु माधवराव पगडी यांनी दिलेल्या माहितीनुसार जे बारा किल्ले महाराजांकडे राहिले, तें असें, ...

१. राजगड २. तोरणा ३. हिंगणगड ४. भोरप ५. तळेगड ६. महागड ७. घोसला ८. बिरवाडी ९. पाली १०. रायरी ११. कुंवारी गड १२. उदय दुर्ग (५१)

किल्ल्यांच्या बाबतीत मिर्झाराजांनी महाराजांशी वाटाघाटी केल्या, व अशाप्रकारे पुरंदरचा तह पार पडला. (दि. १३ जून पर्यंत) दि. १४ जून रोजी महाराज निघाले व दुपारी कोंढाण्यावर (सिंहगडावर) पोहोचले.कारण किल्ला त्यांना स्वत: मोंगलांच्यााब्यांत द्यायचा होता, शिवाय सिंहगडावर जिजाऊ आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती. पुरंदरच्या तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना अतिशय आनंद झाला, कारण शिवबांनी पुरंदरचा तह करून रयतेचे संरक्षण केले होते, स्वराज्य वांचविले होतें. शिवाजीमहाराज 'गमावून' 'जिंकले' होतें ! महाराजांनी तलवारी ऐवजी बुद्धीने काम केले होतें ! सिंहगड ताब्यांत देऊन महाराज आईसाहेबांबरोबर व इतर कुटुंबीयासोबत गड उतरले. जिजाऊ आईसाहेबांना हें माहित होतें की, स्वराज्यरक्षणासाठी कोंढाणा तात्पुरता मोंगलांना द्यावा लागत आहे व संधी मिळताच तो परत घ्यायचा आहें, ... त्या गडाखाली उतरल्या, तों हा निर्धार करूनच !!


Thursday 22 March 2018

शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे....


शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला हे आपल्याला माहित आहे दोनदा टाकला हेही आपल्याला माहित आहे....
त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला...
उत्तरेकडील आग्रा आणि दिल्ली हि शहरे म्हणजे मोगलांची सर्वात मोठी वैभवनगरे... पण यानंतर बुऱ्हानपूर हि मोगलांची एक मोठी वैभवनगरी होती तिची दुसरी ओळख म्हणजे “दक्षिणेचे प्रवेशद्वार”... भारतातली एक मोठी बाजारपेठ होती...
राजाभिषेक १६ जानेवारी १६८१ ला झाला आणि लगेच १४ व्या दिवशी छापा टाकला...
रायगड ते बुऱ्हाणपूर हे १००० किमी पेक्षा जास्त अंतर आहे परंतु फक्त ४ ते ५ दिवसा मध्ये संभाजी महाराज बुऱ्हाणपूर ला पोहोचले...
आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली..


शिवाजी महाराजनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे...

छत्रपती शिवाजी महाराज साहेबांनी स्वराज्यात होणार्या आक्रमणामुळे होणारी तुट आणि नुकसान भरून काढण्यासाठी वेळोवेळी मुघल आणि आदिलशाही मुलखावर स्वारी केली होती.
इ.स.१६६४ पासून शिवाजी महाराज साहेबांनी शत्रूंचे मुलुख लुटण्यास प्रारंभ केला .शिवाजी महाराज साहेबांनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे
१. सुरत दोनदा (१६६४,१६७०)
२.बारिसाल ((१६६४)
३.बऱ्हाणपूर तीन वेळा (१६७०,१६७५,१६७९ )
४.कारंजा (१६७०)
५.बेतीगिरी,भागन गर,कुकली,वेरुड( १६७५)
६.कारवार (१६७७)
७.श्रीरंगपट्टण (१६७७)
८.हुबळी व आसपासचा प्रदेश (१६७७-७८) -महाराज साहेबांचे सरदार दत्ताजी पंडित यांनी आक्रमण करून लुटलेला प्रदेश.
९.नासिक-त्र्यंब क(१६७७-७८)
१०.अथणी व संगम (१६७७-७८)
११.धरणगाव(१६७५)
१२.चोपडे व धरणगाव(१६७९)
१३.औरंगाबाद (१६७९)
१४.कल्याण-भिवंडी येथून भूमिगत द्रव्य

छत्रपती शिवरायांनी जेव्हा पहिल्यांदा सुरतेवर स्वारी केली तेव्हाचे काही आवर्जून मांडावेत असे वृत्तांत.

* शिवरायांच्या या सुरत स्वारीत एवढी गुप्तता होती कि सुरतेच्या फक्त २ मैल अलीकडे जेव्हा मराठ्यांचे सैन्य येऊन ठेपले तेव्हा इनायतखान सुभेदारास या गोष्टीविषयी माहिती मिळाली.
* शिवाजी राजे जेव्हा गणदेवीला असताना, 'शिवाजी राजे आपले नाव सांगत नसून आपण बादशाही सरदार आहोत व अहमदाबादकडे जात आहोत एवढेच सांगत होते.
* सर्व शहराबद्दल हाजी सैद बेग आणि वीरजी व्होरा या दोघांना ताब्यात घेण्यास शिवाजी राजे तयार होते - डच वृत्तांत 
* पोर्तुगीज दप्तर म्हणते - मराठ्यांनी आधी आणून ठेवलेल्या जहाजातून माल चढवून तो पाठवून देण्यात आला.
* कुणी पाठलाग करू नये म्हणून चारशे - पाचशे मावळ्यांची एक फळी मागील बाजूस संरक्षणासाठी ठेवली होती. 
* १० जानेवारी रोजी महाराजांनी सुरत येथेच्छ मारून काढता पाय घेतला तर १७ जानेवारीला बादशहाचे सैन्य सुरत रक्षणासाठी येऊन दाखल झाले. 
* सुरत लुटीने बादशहा हतबल बनला. व्यापाऱ्यातील व रयतेतील मराठ्यांबद्दलची भीती दूर करण्यासाठी त्याला काही प्रभावी उपयोजना कराव्या लागल्या त्या अश्या

i) व्यापाऱ्यांना वर्षभर जकात माफ करणे 
ii) सुरत शहराला भक्कम तट बांधणे (जो १६६९ रोजी पूर्वी पूर्ण झाला) 
iii) मराठ्यांचा बंदोबस्त करणे (जे आयुष्यात कधीच साधता आले नाही :D :D ) 
* इंग्रज फॅक्टरी रेकॉर्ड च्या पत्रात लोकांनी शिवाजींचे शरीर हवामय असून त्यांना पंखही आहेत असे उठविले होते. राजांना भीमाचे सामर्थ्य आहे असेहि लोक मानत.



Wednesday 21 March 2018

शिवाजी महाराजनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे...

छत्रपती शिवाजी महाराज साहेबांनी स्वराज्यात होणार्या आक्रमणामुळे होणारी तुट आणि नुकसान भरून काढण्यासाठी वेळोवेळी मुघल आणि आदिलशाही मुलखावर स्वारी केली होती.
इ.स.१६६४ पासून शिवाजी महाराज साहेबांनी शत्रूंचे मुलुख लुटण्यास प्रारंभ केला .शिवाजी महाराज साहेबांनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे
१. सुरत दोनदा (१६६४,१६७०)
२.बारिसाल ((१६६४)
३.बऱ्हाणपूर तीन वेळा (१६७०,१६७५,१६७९ )
४.कारंजा (१६७०)
५.बेतीगिरी,भागन गर,कुकली,वेरुड( १६७५)
६.कारवार (१६७७)
७.श्रीरंगपट्टण (१६७७)
८.हुबळी व आसपासचा प्रदेश (१६७७-७८) -महाराज साहेबांचे सरदार दत्ताजी पंडित यांनी आक्रमण करून लुटलेला प्रदेश.
९.नासिक-त्र्यंब क(१६७७-७८)
१०.अथणी व संगम (१६७७-७८)
११.धरणगाव(१६७५)
१२.चोपडे व धरणगाव(१६७९)
१३.औरंगाबाद (१६७९)
१४.कल्याण-भिवंडी येथून भूमिगत द्रव्य


मिरवणुकीसाठी हत्ती लागतील याचा विचार छ.शिवरायांनी आधीच करून ठेवला होता....

मिरवणुकीसाठी हत्ती लागतील याचा विचार छ.शिवरायांनी आधीच करून ठेवला होता.छ.शिवरायांच्या सैन्यात हत्तींचा वापर होत नसे.हत्तीचा वापर केवळ शोभेसाठी होत होता.त्याकाळी रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचा मार्ग अतिशय अरुंद होता जेथून माणसालासुद्धा चालणे फार अवघड होते.जर त्या रस्त्यावरून कुणी खाली पडले तर त्याचे प्रेतसुद्धा मिळणे अशक्य होते इतकी खोल दरी तेथे होती. अशा अरुंद रस्त्यावरून एवढे अवाढव्य हत्ती कसे काय रायगडावर पोहोचले हे त्याकाळच्या इंग्रज अधिकाऱ्याला (जो राज्याभिषेकासाठी हजार होता) कळलेच नाही.नंतर फार जास्त विचारपूस केल्यावर कळले की छ.शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या १८ वर्षे अगोदरच दोन हत्तीचे पिल्ले (एक नर एक मादा )कर्नाटक वरून उन्हाळ्याच्या काळात बोलाविले होते.त्यांना छ.शिवरायांचा एक माणूस रोज हिरवा चारा द्यायचा.तेथील वाळलेला चारा खायची त्या हत्तींना सवय लागू दिली नाही.नंतर काही दिवसांनी हाच माणूस हिरवा चारा त्याच्या डोक्यावर घेऊन फिरायचा आणि ते हत्ती भूकेपोटी त्या चाऱ्याच्या मागे फिरायचे.थकल्यावर त्यांना तो चारा मिळायचा.एक दिवस त्या माणसाने तो हिरवा चारा डोक्यावर घेऊन रायगडाच्या अरुंद पायवाटेने चालायला सुरुवात केली.ते दोनीही हत्ती चारयाकडे बघत बघत त्याच अरुंद पायवाटेवरून चालू लागले.त्यांचे लक्ष केवळ त्या चारयाकडे होते.खाली असलेली जीवघेणी खोल दरी त्यांना दिसून चक्कर येऊन त्यांचा खाली पडण्याचा प्रश्नच तेव्हा उरला नव्हता.असे आपल्या अन्नाकडे बघत बघत ते दोनीही हत्तीचे पिल्ले रायगडावर पोहोचले.त्याच दोन हत्तींचे प्रजनन होऊन जे हत्ती पुढे जन्मले त्यापैकी काही मरण पावले आणि फक्त चार उरले त्याच हत्तींवर छ.शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली होती.एवढा दूरदृष्टीकोन ठेवणारे आपले छ.शिवाजी महाराज खरोखर महान होते.
संदर्भ - शिवमुद्रा

Tuesday 20 March 2018

शिवाजी महाराज यांच्या सावलीत बसणं म्हणजे32 मन सोन्या च्या सिहासन बसण्या सारखे आहे,राजे संभाजी महाराज

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील मानला वेदना देणारे क्षण.......
आज काहीतरी लिहिताना खूप #वेदना होत आहेत. #दुःख होत आहे. आणि फार #वाईट देखील वाटत आहे. कारण #लेखक #रणजित #देसाई यांचे #छत्रपती #शिवाजी #महाराजांवर लिखित #श्रीमानयोगी हे #पुस्तक जेव्हा  पहिल्यांदा माझ्या वाचनात आले होते तेव्हा आपल्या शिवाजी महाराजांवर #अन्ना मधून हळूहळू रोज थोड्या थोडया प्रमाणात सौम्य #विषप्रयोग केले गेले होते. हि #गोष्ट वाचून तेव्हा फार दुःख झाले होते, वेदना झाल्या होत्या. आणि त्यांच्यावर अन्नाच्या माध्यमातून विषप्रयोग करणाऱ्या लोकांचा देखील मला भरपूर राग आणि संताप आला होता.रणजित देसाई यांनी श्रीमानयोगी मधून महाराजांच्या जीवनातील हा कटू प्रसंग ज्या शब्दात मांडला आहे ते वाचताना खरच डोळ्यात #पाणी जमा होते. पुढील पान वाचण्यासाठी मन धजावते. शिवाजी महाराजांचे ते होणारे #हाल, त्यांना होणाऱ्या #व्यथा, #वेदना नाही वाचायला होत. आणि आज तोच श्रीमानयोगी मध्ये वाचलेला प्रसंग #झी #मराठी वरील #स्वराज्यरक्षक #संभाजी या मालिकेच्या माध्यमातून पाहताना हृदयाला फार वेदना झाल्या. खूप वाईट वाटले.
        अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी #मुघल #बादशाह औरंगजेबाने काळ्या विद्येचा देखील वापर केला होता. तो #औरंगजेब देखील अखेर हतबलच झाला होता. त्यात त्याला शेवट पर्यंत काही #यश आले नव्हते. महाराजांवर औरंगजेबकडून #काळी #विद्या करू पाहणार जो #मांत्रिक होता तो औरंगजेबाला बोलला होता स्वतःची #जान प्यारी असेल तर या सीवा वर काळी विद्या करण्याचा नाद सोड. काळ्या विद्येच्या माध्यमातून आपण सीवा चा बाल पण बाका करू शकत नाही कारण त्याचा जो कोणी #गुरु आहे अथवा तो ज्या कोणाला याद फर्मावतो; त्याचा तो देव, खुदा,भगवंत खूप मोठा आहे. शक्तिशाली आहे. ताकदवर आहे. तो आपल्याला या गोष्टीत कधीच यशस्वी होऊ देणार नाही. मी काही करू शकत नाही आणि मला माझी जान देखील प्यारी आहे. मी यापुढे या मार्गाच्या माध्यमातून कधीच शिवाच्या मार्गाला जाणार नाही. तेव्हा तू पण माझ्या नंतर दुसऱ्या कोणाकडून असा काही प्रकार करण्याचा विचार देखील करू नकोस आपल्याने ते होणार नाही. शिवा कोणी तरी मोठा फरिश्ता आहे असे वाटते. त्याच्यापुढे आपण या अश्या काळ्या विद्येच्या मार्गाने कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. हि गोष्ट अखेर कुठे तरी जाऊन पाटल्या नंतर तेव्हा कुठे जाऊन औरंगजेबाने शिवाजी महाराजांवर स्वतःकडून केला जाणार काळ्या विद्येचा प्रयोग करण्याचा विचार थांबवला होता. आणि त्यामुळे असे देखील बोलले जाते की त्यामुळे औरंगजेब हा आपल्या शिवाजी महाराजांना थोडा दचकूनच होता. म्हणून महाराजांच्या उभ्या हयातीत तो स्वतः कधी दक्षिण भारतावर चाल करून आला नाही. तो स्वतः आला ते थेट संभाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाल्या नंतर. परंतु शिवाजी महाराज या भूतलावर असे पर्यंत औरंगजेब नामक या दानवाने कधीच दक्षिण भारतकडे मान वर करून पाहिले नाही. या मागे त्या मांत्रिकाने दिलेला सल्ला आणि त्याचा औरंगजेबाने घेतलेला धसका हे देखील या मागील अनेक इतर कारणां मधील एक कारण होते असे समजले जाते.
        हा एक वेगळा भाग झाला परंतु काळ्या विद्येसारख्या तमाचारी मार्गाच्या मदतीने औरंगजेबाला जे जमले नाही ते महाराजांच्या घरातील कुटुंबातील एका खूप जवळच्या व्यक्तीने आपल्या अतिमत्वकांक्षेच्या वृतीला बळी जात करून दाखवले. जर महाराजांवर जेवणाच्या माध्यमातून असे सौम्य विषप्रयोग केले गेले नसते तर खरंच महाराजांना आणखी काही वर्षांचे आयुष्य लाभले असते. अवघ्या ५२ व्या वर्षी महाराजांनी आपला देह सोडला.रयतेचा वाली, जानता राजा युद्धभूमीवर नाही तर रायगडावरील आपल्या महालातील भीछायतीवर शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेता झाला.
        कधी कधी मनात एक विचार येतो जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबा एवढे आयुष्य लाभले असते तर??? आज आपल्याला आपल्या भारत देशाचा एक वेगळा इतिहास वाचायला मिळाला असता. परंतु तसे होऊ शकले नाही. त्याला कारण इतकेच जे कोणी परका दुश्मन करू शकला नाही ते घरातील कुटुंबामधील खूप जवळचा व्यक्ती करू शकला. नाहीतर त्या काळी काय कोणाची मजाल होती शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का लावण्याची.
        आजचा स्वराज्यरक्षक संभाजीचा भाग पाहताना नाय पाहवले गेले महाराष्ट्राच्या नृसिंहाला भीछाण्यावरती असे खूप वेदनेने विव्हळताना. मनात सारखे वाटत होते कि अरे आज ज्या व्यक्तीमुळे आपण आपल्याच भूमीत सहीसलामत राहिलो. आपले आडनाव हिंदू असून पण आपण धर्माने पण हिंदूच राहिलो. अरे ज्या आपल्या राजाने  आपल्या समाजातील लोकांचे भविष्य ओळखून आपला वर्तमान सतत आपल्या लोकांचे एक सुवर्ण भविष्य असावे या साठी विविध युद्धांनमध्ये, मोहिमांमध्ये व्यस्त राहून नेहमी संघर्षयुक्त असाच ठेवला आणि खूप मोठा असा महापराक्रमी असा इतिहास संपूर्ण जगासमोर ठेवला. त्या आपल्या जाणत्या राजाचा मृत्यू केवळ आणि केवळ त्याला अन्नतून रोज थोडे थोडे सौम्य विष दिले जात होते या एका कारणामुळे झाला हे कारणच मनाला खूप वेदना देणारे आहे. हा विषय सर्वांसमोर मांडण्याची हिंमत आजवर खूप कमी लेखकांनी तसेच शिवाजी महाराजांवर चित्रपट आणि मालिका निर्माण करणाऱ्या निर्मात्यांनी केली. त्या सर्वांना खरच माझा मनाचा मुजरा.
         स्वराज्यरक्षक संभाजी पाहताना एक गोष्ट नेहमी जाणवत राहते ज्या गोष्टी आजपर्यंत खूप स्पष्टपणे पुढे आल्या नव्हत्या त्या स्पष्टपणे पुढे आणण्याचे काम हि मालिका करत आहे. मालिकेवरून कोणता वाद निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्यावर हि काही बंधने असू शकतात असतीलही आणि म्हणूनच त्या बांधनामध्ये राहूनच त्यांना मुख्यकरून महाराजांची पत्नी सोयराबाई आणि सुरवणीस अण्णाजी दत्तो अश्या कित्येकांचे  व्यक्तिमत्व एका चौकडीच्या पलीकडे न जाता दाखवावे लागत आहेत.परंतु हि दोन व्यक्तिमत्व जर खऱ्या अर्थाने तुम्हाला समजून घ्यायची असतील तर तुम्हाला त्या साठी शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावरती विविध सुप्रसिद्ध अश्या लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचावी लागतील. आणि ती एकदा का तुम्ही वाचली तर तुम्हाला कळून चुकेल कि या दोन व्यक्तिरेखा काय आणि कुठल्या पातळीच्या होत्या ते. तुम्हाला त्यांचा संताप आल्या शिवाय राहणार नाही. राहता राहिला प्रश्न आपल्या शिवाजी महाराजांवर विषप्रयोग कोणी केला याचा. मालिकेच्या माध्यमातून पुढे काय दाखवले जाते हे आपण पाहूच पण खऱ्या अर्थाने जर आपणास या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यावर प्रसिद्ध लेखकांकडून लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकां मध्ये दडून बसलेल्या काही पानांन मध्ये मिळेल. इतकेच बोलून मी आपली रजा घेतो.
source internet
जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शंभूराय

Sunday 18 March 2018

गनिमी कावा म्हणजे नेमके काय....?

अखंड हिंदुस्तानात सोळाव्या शतकात ह्या युद्धपद्धतीत शिवाजी महाराजांचा हात धरणारा दुसरा कोणीही नव्हता. किंबहुना शिवाजी महाराज गनिमीकाव्याचे गुरु होते असे
म्हंटले तरी चालेल.

शत्रूला तोंड देऊन न लढता त्याच्या भोवती घिरट्या घालून त्याची रसद तोडणे, शत्रूच्या आजूबाजूचा सगळा मुलुख बेचिराख करून त्याला अन्नपाणी मिळू न देणे, शत्रू युद्धात गुंतला असता त्याच्या राज्यात शिरून लूटमार करणे, आता त्याच्या प्रदेशात लूटमार सुरु झाल्यामुळे शत्रूला आपल्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी म्हणून युद्ध सोडून परत आपल्या प्रदेशाकडे जाण्यास भाग पाडणे, शत्रूच्या छावणीवर शत्रू बेसावध असताना वारंवार छापे घालून त्याचे बळ कमी करणे असे हे गनिमी काव्याचे काही प्रकार.
गनिमी काव्यास डोंगराळ आणि झाडीचा प्रदेश सोयीचा असतो. शिवाजी महाराजांना कोंकण आणि मावळ ह्या प्रदेशांतील भाग या धोरणासाठी सोयीचा होता. फत्तेखान, अफझलखान, रुस्तुमजमा, सिद्धी जोहर, शाईस्ताखान, मिरझा राजा जयसिंग असे अनेक सरदार जेंव्हा स्वराज्यावर चाल करून आले तेंव्हा शिवाजी महाराजांनी अतिशय हुशारीने
ह्या गनिमी काव्याचा अगदी पुरेपूर वापर केला.
आता आपण ह्याची काही उदाहरणे पाहू.
विजापूरवर जेंव्हा मोगलांकडून दिलेलखानाने स्वारी केली तेंव्हा ह्या दिलेलखानाविरुद्ध विजापूरच्या मसाऊद ह्याने शिवाजी महाराजांची मदत मागितली.
ह्या वेळी दिलेलखान अगदीच विजापूरला येऊन भिडला होता. त्यामुळे महाराजांनी असा विचार केला कि विजापुरास मसाऊदच्या मदतीला जाऊन काहीही फायदा होणार नाही. कारण आता दिलेलखान हा विजापूरच्या वेशीवरच उभा आहे. म्हणून मग शिवाजी महाराजांनी जलदीने मोगलांच्या मुलखांत शिरून लूटमार करण्यास सुरवात केली. शिवाजी महाराजांनी खूपच धूम मांडली.
शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांस ह्या विषयी एक फार सुरेख पत्र लिहिले आहे.
पत्र फार महत्वाचे आहे. (मोठ्याने वाचा म्हणजे समजावयास सोपे जाईल. कुठे शब्द जर समजले नाहीत तर मला विचारा. )
ते असे:
शिवाजी महाराज लिहितात, " दिलेलखानाने विजापूरची पातशाही कमकुवत देखोन जोरावर धरून विजापूर घ्यावे या मतलबे विजापुरावर चाल केली. भीमा नदी उतरून शहरानजीक येऊन भिडला. हे वर्तमान अलिशान मसउदखान यांनी आम्हास लिहिले कि गनिमे जोरावर बहुत धरली आहे. येऊन मदत केली पाहिजे. त्यावरून आम्ही त्याच क्षणी स्वार होऊन मजली दर मजली करत पनालियास आलो. ( म्हणजे पन्हाळा किल्यास आलो.)
सारी कुळ जमेती जमा करून खासा लष्करानिशी विजापुरा सन्निध गेलो. विचारे पाहता गनीम कट्टा. (गनीम कट्टा म्हणजे शत्रू शुर आहे.) त्याहीमध्ये पठाण जाती हट्टी, याशी हुन्नरेच करून खजील होऊन नामोहरण होय तो हुन्नर करावा. म्हणून ऐशी तजवीज केली कि त्याचे मुलकांत फौजाचा पैसावा करून ओढ लावावा.
त्यावरून दिलेलखानास तीन गावांचे अंतरे सोडून भीमानदी उतरून तहद जालनापूर पावेतो मुलुख तारखत ताराज करीत चाललो. जालनापुरास जाऊन चार दिवस मुक्काम करून
पेठ मारिली. बहुत मालमत्ता हाती लागली.
जालनापुराहुन चार गावे औरंगाबादे जागा शहजादा असता त्याचा हिसाब न धरता पेठ लुटली. सोने, रूपे, हत्ती, घोडे, यांखेरीज मत्ता बहुत सापडली. ती घेऊन पट्टागड तरकीस स्वार होऊन कूच करून येता, मध्ये रणमस्तखान, व असफखान व जाबीतखान असच आणिक पांच सात उमराऊ आठ-दहा हजार स्वारांनिशी आले. त्यास शाहाबाजीच्या हुन्नरे जैशी तंबी करून घोडे व हत्ती पाडाव करून व पटियास ( पट्टा गड) आलो.
मागती लष्कर मुलकांत धुंदी करावयास पाठविले. "
मराठ्यांचं सैन्य गनिमीकाव्यात अत्यंत हुशार होत ह्याचा अर्थ मराठ्यांचे सैन्य मरणाला भिणारे होते असे नाही. 'मृत्यूविषयी बेफिकीर' हे तर मराठ्यांचे ब्रिदवाक्यच होते.
सभासदाने आपल्या शिवचरित्रात ह्या विषयी एक सुंदर श्लोक
लिहिला आहे.
जितेन लभते लक्ष्मी मृत्यनापि सुरंगना: I
क्षण विध्वंसिनी काया का चिंता मरणे रणे II
शिवाजी महाराज यवनांच्या लष्करी छावणींतील माहिती अतिशय हुशारीने काढून घेत. ती अशी.
" तो (म्हणजे शिवाजी महाराज) अंगावरचे सगळे कपडे काढून लंगोटी लावलेला माणूस शिबिरांत पाठवी. त्याने डोक्यावर गवताचा भारा घेऊन खानाच्या छावणीत जावे व गवत विकण्याकरिता घोड्यांच्या पागेची वाट धरावी आणि जाता येता शिबिरांत जाण्याच्या व येण्याच्या वाटा नीट पाहून मिळेल ती माहिती घ्यावी.
हि माहिती अपुरी वाटल्यास शिवाजीने स्वतः नेताजीस बरोबर घेऊन शिबिरांत गवत विकण्यास जावे. तेथे असता शत्रूचा विश्वास बसण्याकरिता त्याने ( म्हणजे शिवाजी महाराजांनी) आपणांस कश्या जखमा केल्या या विषयी त्यांनी आपसांत मोठ्याने गोष्टी बोलाव्यात. आणि चोहोकडे बारीक नजरेने टेहाळणी करावी. तिला हवा तितका वेळ न मिळाल्यास गवताचे भारे सुटल्याचे निमित्त करून तिथेच बसावे आणि ते बांधता बांधता आणखी काही हेरून निघून यावे."
शाहिस्तेखानावर छापा घालण्यापूर्वी महाराजांनी अशीच हेरगिरी केली असावी.
शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा आजून एक किस्सा सांगतो:
एकदा विजापूरच्या सैन्याने घाटाची नाकेबंदी केली होती. आणि शिवाजी महाराज घाटाखाली अडकून पडले होते. महाराजांना घाट चढून सैन्यानिशी देशावर यायचे होते. त्यासाठी महाराजांनी आपली झालेली कोंडी पुढील उपायाने फोडली.
महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या लहान-लहान टोळ्या करून एका मागून एक टोळी वेगवेगळ्या वाटांनी घाटावर पाठविली. महाराजांच्या पहिल्या टोळीतील मावळे प्रथम विजापूरकरांच्या घाटावरील चौकीपाशी येऊन बसले. त्यांनी खूप दमल्याचा बहाणा करण्यास सुरवात केली. त्यांना पाहून चौकीवरील विजापूरकरांच्या सैनिकांनी विचारपूस सुरु केल्यावर त्यांस सांगितले कि आम्ही तुमच्याच सैन्यात भरती
व्हायला आलो आहोत. तेवढ्यात महाराजांची दुसरी टोळी तिथं पोहचली. त्या टोळीने चौकीच्या सैनिकांना सांगायला सुरवात केली कि "त्या चांडाळ शिवाजीने आमचे गाव लुटले आणि आमची माणसे मारली हो. आम्ही तेथून कसेबसे जीव वाचून सुटून आलो आहोत.
आम्हाला त्याच्यावर सूड घ्यायचा आहे. "
विजापूरकरांच्या चौकीवरील पहाऱ्यावर एकंदरीत तीस सैनिक होते. शिवाजी महाराजांचे मावळे होत होत करत ह्या तिसांना पुरून उरेल इतके जमले. त्यांतील काहींनी विजापुरी सैनिकांना बोलण्यात गुंतवून बाकीच्यांनी त्यांस वेढले आणि सर्वानी मिळून त्या विजापुरी सैनिकांना एकदम ठार मारले.
अश्याच गनिमी काव्याच्या क्लुप्त्या वापरून शिवाजी महाराजांनी शत्रूचे घाटमाथ्यावरील सगळे पहारे मोडून काढले आणि वाटा मोकळ्या केल्या."
शाहिस्ताखान जेंव्हा स्वराज्यावर चालून आला तेंव्हा त्याच्या सैनिकांनी शिवाजी महाराज पाहिले नव्हते. त्यामुळे मोगलांना शिवाजी महाराजांचे सैनिक शिवाजीचं वाटत असत. शिवाजी महाराजांचे सगळे सैनिक शरीराने आणि पोशाखाने सारखेच दिसत.
त्यामुळे महाराजांचा छापा पडला कि 'शिवाजी आला शिवाजी आला' अशी एकच हूल मोगलांच्या छावणीत उठत असे आणि पळापळ सुरु होत असे.
महाराज छापा घालताना पकडलेल्या सैनिकांचे अंगावरचे कपडेही काढून घेत असत. हे कपडे पुढील छाप्यात शत्रूस भ्रमात पाडण्यास कमी येत असत.
तर असा हा गनिमी कावा.
लेखक सतीश शिवाजीराव कदम


Saturday 17 March 2018

'मृत्युंजय अमावस्या' म्हणजेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ३२९ वा बलिदान स्मरण दिवस..

'मृत्युंजय अमावस्या' म्हणजेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा ३२९ वा बलिदान स्मरण दिवस...


बरोब्बर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची औरंग्याने निर्घृण हत्या केली...

या अमावास्येला आपण मृत्युंजय अमावस्या म्हणतो.

चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसूभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकमल अर्पण करणाऱ्या संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला. म्हणून ही मृत्युंजय अमावस्या..

चालताना साधा काटा रुतला तर आई गं म्हणणारे आपण... कसं सोसलं असेल हो त्या सिहांच्या छाव्याने? अंगावरचे केस उपटले गेले, सालटी काढली गेली, त्यावर मीठ टाकलं गेलं, मिरचीची धुरी देण्यात आली, चाबकांचे फटके मारण्यात आले, हाता पायाची नखे उपटण्यात आली, जीभ छाटली गेली, दोन्ही डोळ्यात तापलेल्या लालबुंद सळया टाकण्यात आल्या.. हात पाय तोडण्यात आले, आणि शेवटी शिर छाटण्यात आले...रोज एक एक छळ. असे किती दिवस?? तब्बल चाळीस दिवस... किती ही सहनशीलता? किती हे धैर्य? किती हे कठोर मनोबल? कुठून आलं हे सर्व? कोणी बळ दिलं इतकं सोसायला? कोणासाठी? कशासाठी सहन केलं?

संभाजीराजांच्या बलीदानानंतर महाराष्ट्रात क्रांती घडली

संभाजीराजांच्या या बलीदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि पापी औरंग्याबरोबर मराठ्यांचा निर्णायक संघर्ष सुरू झाला. `गवताला भाले फुटले आणि घराघरांचे किल्ले झाले, घराघरातील माता-भगिनी आपल्या मर्दाला राजाच्या हत्येचा सूड घ्यायला सांगू लागल्या', असे त्या काळाचे सार्थ वर्णन आहे. संभाजी महाराजांच्या बलीदानामुळे मराठ्यांचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला, ही तीनशे वर्षांपूर्वीच्या राष्ट्रजीवनातील अतिशय महत्त्वाची बाब ठरली. यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली. जनतेच्या पाठिंब्यामुळे मराठ्यांचे सैन्य वाढत गेले आणि सैन्याची संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली. जागोजागी मोगलांना प्रखर विरोध सुरू झाला आणि अखेर महाराष्ट्रातच २७ वर्षांच्या निष्फळ युद्धानंतर औरंगजेबाचा अंत झाला आणि मोगलांच्या सत्तेला उतरती कळा लागून हिंदूंच्या शक्‍तीशाली साम्राज्याचा उदय झाला.

२७ वर्षे औरंगजेबाच्या पाशवी आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी केलेल्या संघर्षात हंबीरराव, संताजी, धनाजी असे अनेक युद्धनेते होते; परंतु या लढ्याला कलाटणी मिळाली ती संभाजीराजांच्या बलीदानातून झालेल्या जागृतीमुळेच.

" श्री शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर नऊ वर्षे संभाजीराजांनी औरंगजेबाच्या टोळधाडीपासून हिंदवी स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धन केले. फितुरीमुळे शत्रूच्या तावडीत सापडलेल्या राजांनी मृत्यू स्वीकारला; परंतु स्वधर्म आणि स्वाभिमान सोडला नाही ! त्यांच्या बलीदानामुळे मराठे पेटले आणि मोगल हटले ! हा महाराष्ट्राच्या विजयाचा ज्वलंत इतिहास आहे.

"छत्रपती श्री संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 

Friday 16 March 2018

जंजिरा मिळाला नाही ,तरी त्यांची खंत करत न बसता दुसरा जंजिरा निर्माण करणाऱ्या त्या जिद्दीला राजे शिवराय स्मरण करावे.-

जंजिरा मिळाला नाही ,तरी त्यांची खंत करत न बसता दुसरा जंजिरा निर्माण करणाऱ्या त्या जिद्दीला राजे शिवराय स्मरण करावे.-

जिंजीरा भेटत नाही म्हणून खंत न करता ..आरमार चे महत्व ओळखून राजेंनी त्या काळी सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग ,पद्म दुर्ग या सारखे आरमार उभे केले हि काय सोपी गोष्ट नाहीये.. असे खंबीर आरमार तयार केले कि जे पुढे अरबी समुद्रात इग्रजना हि भारी पडले .

राजे चे एक वाक्य

ज्याचा दर्या ,त्याचे वैभव

ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..

“व्यापार हवा ,वैभव हवे ,तर समुद्र ताब्यात हवा .ह्या सूत्र समजून त्यांनी आरमार स्थापन केले .


अवघ्या हिन्दुस्तानात कोण्या राज्यकरत्याला 16 व्या शतकात आरमार उभे करणे जमले नव्हते.त्याची मुहूर्त मेढ़ महाराजांनी रचली आणि आरमार उभे केले. मराठा आरमार हे महाराजांच्या दुरदृष्टीचे मोठे उदाहरण म्हणावे लागेल.
हेआरमार उभे करताना बांधण्यात आलेल्या बोटी ह्या साध्या पद्धतीच्या होत्या. ह्या बोटी पाहून ब्रिटिश हसत असत आणि म्हणत असत की "ही काय आपल्याशी लढा देणार." पण महाराजांनी अवघ्या पंधरा वर्षात अश्या काही तांत्रिक पद्धती वापरल्या की त्या ब्रिटिश राज्य कर्त्यांना मराठा अरमाराची भीती वाटू लागली.
महाराजांनी आरमारी मोहिमा करुण ब्रिटिश,फ्रेंचाना अगदी सळो की पळो करुण सोडल. ह्या आरमाराने खुप विजयी पताका भारतीय सागरी तटांना लावल्या.
महाराजांना अनेक विजयिश्री मिळाल्या. पण ह्या मोहिमा सैन्य,पैसा,शस्त्रास्रे यांच्या बळावर चालत नसतात तर ती राजाच्या ध्येय धोरणावर असलेल्या सेन्याच्या निष्ठेच्या बळावर चालतात हे महाराजांनी दाखवून दिले.महाराजांच्या मुखातुन निघालेली आज्ञा मावळे प्राण गेला तरी त्या आज्ञेवर ठाम राहत.
ह्याच मावळ्यांच्या निष्ठे पाई मराठ्यांचे अद्वितीय आरमार उभे राहिले अन अवघ्या रयतेचे स्वराज्य उभे राहिले.

हे सूत्र पुढे पेशवे, मराठे विसरले त्यामुळे इग्रजनी हिन्दुस्तान बळकावला आणि आज २६/११ सारखे मुंबईवर हल्ले..

Wednesday 14 March 2018

हेन्री ओक्सिटन ने एकडायरी लिहली त्यात तो लिहतो की...


छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी एक वकील आला होता त्याचे नाव होते हेन्री ओक्सिटन....अणि या हेन्री ओक्सिटन ने एकडायरी लिहली त्यात तो लिहतो की....मी रायगडा वर आलो मी शिवाजी महाराजांच्या राज्यभिशेकाचा सोहळा बघितला अणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट झाली ती शिवाजी राज्यांच्या मुलाशी म्हणजे संभाजी राज्यांशी त्यावेळी माझ्या लक्षात आलेकी....हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो .... उत्तरेतल्या लोकांशी हिंदी मधे बोलतो.... आम्हा इंग्रजांशी इंग्रजी मधे बोलतो......पोर्तुगिजंशी पोर्तुगीज मधे बोलतो ....अरे या शिवाजी राजांनी आपल्या मुलाला भाष्या शिकवाल्यात तरी कीती ????
..संभाजी राज्यांच १४ भाष्यांवर प्रभुत्व होत..

--हेन्री ओक्सिटन

"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."

- ऍबे कँरे (१६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवाशी)

स्टीफन हॉकिंग Stephen Hawking 1942-2018

 स्टीफन हॉकिंग Stephen Hawking

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई इझाबेल ऑक्सफर्डची पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड हा दत्तक भाऊ अशी भावंडे होती.हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी, डॉ. फ्रँक आणि इझाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणी हॉकिंग यांना वाचनाची खूप आवड होती.

स्टीफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्टसचे मानद सदस्य आहेत. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले. केंब्रिज विद्यापीठात तीस वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते. कृष्णविवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत, हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथाने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे.

स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण, सेंन्ट अल्बान्स स्कूल या शाळेत झाले. हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलांना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा, त्यांनी १९५९ साली वयाच्या १७ व्या वर्षी कॉसमॉलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे प्रवेश घेतला.

एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.

स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.

१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.

१९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.

स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.

अशा या महान शास्त्रज्ञाचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज निधन झाले. केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाल्याचे हॉकिंग कुटुंबीयांनी सांगितले.

Quotes
Intelligence is the ability to adapt to change.
The greatest enemy of knowledge is not ignorance, it is the illusion of knowledge.
I have noticed even people who claim everything is predestined, and that we can do nothing to change it, look before they cross the road.



Tuesday 13 March 2018

किल्ला म्हणजे काय ?

किल्ला म्हणजे काय ? त्याचे प्रकार किती ? महाराष्ट्रासह देशात असे किती किल्ले आहेत ? कुठे आहेत ? तिथे पोचायचे कसे ? ते किल्ले पहायचे कसे ? त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय ? त्यांची आजची परिस्थिती कशी आहे ? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम किल्ला म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे.

किल्ला म्हणजे काय ? :
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वत आहेत. आणि याच परिसरात आपल्याला सर्वाधिक किल्ले पहायला मिळतात. डोंगर, कडे कपारीमध्ये किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश काय असावा, असा प्रश्न देखील आपल्या समोर येतो. परंतु जिथे राहून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल, वेळ प्रसंगी शत्रूवर हल्ला करता येईल आणि नैसर्गिक किंवा बांधकाम करून दुर्गम केलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे आपले संरक्षण ही होईल, अशा ठिकाणीच किल्ले बांधलेले दिसून येतात. म्हणजेच इतिहासात स्वतःचे साम्राज्य शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वेळ प्रसंगी राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या अशा ठिकाणांना किल्ला असे म्हणतात.

किल्ल्याचे प्रकार
: किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेल्या स्थानावरून त्याचे प्रकार पडतात. आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत.
वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला, गव्हरं म्हणजेच एखाद्या गुहेचा उपयोग करून त्याचा वापर किल्ल्यासारखा होत असेल तर, कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशात बांधण्यात आलेला किल्ला, तसेच केवळ कोट किंवा गढी स्वरूपातील इमारती किल्ल्याप्रमाणेच मानल्या जातात.

महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास : महाराष्ट्र हा असा प्रदेश आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील परकीयांनी राज्य केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बांधण्यात आलेल्या किल्ल्यांवर या परकीयांच्या बांधकाम कौशल्याची छाप दिसून येते. महाराष्ट्रात बांधण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये आफ्रिकन लोकांपासून ते युरोपीय लोकांपर्यंत सर्वांच्या कौशल्याचा सहभाग आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन राजवंशापासून ते राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, कदंब, बहमनी, मोगल, दक्षिणी पातशाह्या, मराठेशाही, पेशवाई, हबशी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज अशा वेगवेगळया काळातल्या सत्ताधीशांनी हे किल्ले बांधलेले आहेत.

किल्ल्याचे भाग : किल्ला बांधत असताना किंवा किल्ला बांधणीची जागा हेरत असताना विशेष काळजी घेतली जात असे, त्यानुसार किल्ला बांधलेल्या जागेचे चार भाग पडतात. घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला हे किल्ल्याचे मुख्य भाग आहेत. घेरा म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेले गाव, मेट म्हणजे किल्ला आणि गाडीतळाजवळील गाव यांच्यामध्ये असणारी मोक्याची तटबंदी रहित जागा, माची म्हणजे किल्ल्यावरील बालेकिल्ल्याखालील सपाट प्रदेश आणि शेवटी बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरील सर्वात संरक्षित ठिकाण होय.


किल्ल्यांवरील ठिकाणांची नावे
किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या प्रत्येक इमारतीस, प्रत्येक बांधकामास विशिष्ठ नावे देण्यात आलेली आहेत. काही किल्ल्यांना विशिष्ठ प्रकारे बांधण्यात आलेल्या माच्या, तटबंदी, प्रवेशद्वार असतात. त्यानुसार त्या किल्ल्यांचे महत्व बदलत जाते.
महादरवाजा : किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या मुख्य प्रवेशद्वारास महादरवाजा असे म्हणतात. काही किल्ल्यांवर महादरवाज्याच्या संरक्षणासाठी बुरुजांची रचना केलेली असते. काही किल्ल्यांवर एकामागोमाग एक असे अनेक दरवाजे असतात. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांना बसण्यासाठीची जागा ठेवलेली असे, त्यास ‘देवडी’ असे म्हणतात.
नगारखाना : किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना असे. गडाची दारे उघडताना आणि बंद करत असताना तसेच महत्त्वाच्या प्रसंगी येथे नगारे वाजवले जात.
तटबंदी : किल्ल्याची माची आणि बालेकिल्ला या भागात दगडी बांधकामात बांधण्यात आलेल्या भिंती आहेत, या भिंतींना ‘तटबंदी’ असे म्हणतात. किल्ल्याच्या दिशेने तोफेच्या गोळ्याचा मारा झाला, तर किल्ल्यावर त्याचा परिणाम कमी व्हावा, याकरिता तटबंदीची भिंत नागमोडी बांधत असत.
बुरुज : तटबंदीमध्येच काही ठराविक अंतरावर तटबंदीपासून पुढे आलेले बुरुज बांधले जात असत. हे बुरुज काही किल्ल्यांवर अर्धगोलाकार, त्रिकोणी, षटकोणी तर काही किल्ल्यांवर कमळाच्या फुलाच्या आकारात बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवर तोफा ठेवल्या जात असत.

ढालकाठी : ढालकाठी म्हणजे निशाण रोवण्यासाठी बांधलेला दगडी ओटा होय. ढालकाठी बहुधा एखाद्या बुरुजावर उभारण्यात येत असे.
जंग्या : तटबंदी आणि बुरुजावरून गोळीबार करण्यासाठी ठिकठिकाणी छिद्रे ठेवलेली असत, त्यांना जंग्या म्हणतात.
चऱ्या : किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजावर घडीव किंवा पाकळ्यांच्या आकाराचे दगड ठेवलेले असत, त्यांना चऱ्या असे म्हणतात. या चऱ्यांच्या आड लपून किल्ल्यावरून गोळीबार करता येत असे.
फांजी : किल्ल्याच्या तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी जागा ठेवलेली असे, त्यास ‘फांजी’ म्हणतात.
धान्य कोठार (अंबरखाना) : किल्ल्यावर धान्य साठवण्यासाठी बांधलेली इमारत म्हणजे धान्य कोठार (अंबरखाना).

दारू कोठार : किल्ल्यावरील दारूगोळा या कोठारामध्ये साठवला जात असे. हे दारू कोठार लोक वस्तीपासून दूर बांधले जात असे.
पागा : किल्ल्यावर घोडय़ांना बांधून ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या जागेस पागा असे म्हणतात.
चोर दरवाजा : प्रत्येक किल्ल्यावर येण्यासाठी महादरवाजा सोडून इतरही एक ते तीन दरवाजे असत, छोट्या वाटेचे अथवा चढाईस कठीण असलेल्या अशा दरवाज्यांना चोर दरवाजा असे म्हणत असत. हे चोर दरवाजे तटबंदीमध्ये लपवलेले असत. छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या अनेक कामांसाठी या दरवाज्यांचा उपयोग होत असे.
पाण्याचे टाक/ तलाव/ विहीर : किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा साठा असावा या उद्देशाने ठिकठिकाणी टाक, तलाव आणि विहिरी बांधलेल्या असत. या पाण्याच्या साठ्यांची विशेष काळजी घेतली जात असे.
राजवाडा अथवा इमारती : किल्ल्यावर राहणाऱ्या खास मंडळींसाठी राजवाडे, कचेरी, सदर इत्यादी इमारती बांधलेल्या असत. काही किल्ल्यांवर अशा काही विशिष्ठ इमारती आहेत, ज्यांना विशेष महत्व आहे.
शिलेखाना : शिलेखाना म्हणजे चिलखते आणि शस्त्रास्त्रे ठेवण्याची जागा होय. याठिकाणी अवजारांना धार लावणारे शिकलगार आणि लोहार नेमलेले असत.

कडेलोटाची जागा : गुन्हेगारास शिक्षा म्हणून, त्याला किल्ल्यावरून खाली ढकलून दिले जात असे, किल्ल्यावरील ज्या ठिकाणावरून खाली ढकलले जात असे, त्या जागेस कडेलोटाची जागा असे म्हणत.
किल्ला कसा पहावा याचं देखील एक तंत्र असतं, प्रत्येकाने किल्ल्याची वाट चालत असताना हे तंत्र पाळत आणि किल्ल्याचे सौंदर्य अनुभवत दुर्ग भ्रमंती करायला हवी. दुर्ग भ्रमंती करत असताना ज्या व्यक्तीचे त्या किल्ल्यासंबंधी काही वाचन आहे, ती व्यक्ती कल्पनाशक्तीच्या आधारे किल्ल्यांचे सौंदर्य आणि इतिहास अनुभवू शकते.


Monday 12 March 2018

संभाजीराजाबद्दल! खरंच अजून कायकाय असेल? कसे घडले असतील? कसे घडवले असतील शिवा-छावा ?

“छत्रपती संभाजी महाराज”*
शंभुराजांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा तो औरंगजेब “सिवाच्या पोराला” पाहायला सिंहासन सोडून खाली उतरला. अत्याचाराने माराने घायाळ झालेले शरीर, पण….
मान ताठच, नजर हि तशीच….
त्या नजरेकडे पाहत औरंगजेब विचार करू लागला….
तो हाच का संभा?? ज्याने ह्या आलमगीराला नऊ वर्षे रानोमाळ हिंडवल….
एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन फिरतो तद्वतच ह्याने मला फिरवलं…..
माझे नामांकित सरदार ज्यांच्या शौर्यावर मी अनेक लढाया जिंकल्या, त्यांनाच ह्याने आस्मान दाखवलं??
माझी कैक लाखांची सेना… लांबून एखाद्याने पहिली तर छातीत धडकीच भरावी एवढं अफाट अफाट मनुष्यबळ…. पण ह्या संभाजीने पार वाट लावली त्यांची,
तो हाच का संभाजी?? वाटलं होत संभा म्हणजे शिवाजीच्या पोटाला आलेला तख्तनशील वारीस, संभाजी म्हणजे व्यसनी, दुराचारी, संभाजी म्हणजे बदफैली, संभाजी म्हणजे नादान बच्चा सिवाचा, पण….. पण नाही, माझा अंदाज साफ चुकला,
ह्या नादान पोरानं बुढाप्यामध्ये मला जवान बनवलं, त्या सिवापेक्षा दहापट अधिक तापदायक आहे हा संभाजी…..
अरे त्या सीवाने माझे किल्ले किल्ले जिंकले, प्रदेश जिंकला पण कधी बुऱ्हाणपूरला हात नाही घातला, पण हा संभाजी गादीवर आला आणि सगळ्यात आधी ह्याने बुऱ्हाणपूर लुटलं, भागानगर जाळून टाकलं, कैक कोटींचा खजिना ह्याने ओढून आपल्या वळचणीला टांगला…
साढे आठ वर्षांचा असताना हा आला होता सिवाबरोबर आग्र्यात, त्यावेळी मी त्याला विचारलं होत… “क्यों रे संभा, तुम्हे डर नही लगता हमारा??” तेव्हा हा म्हणाला होता, “हमें किसीका डर नही लगता, पर हमारी वजाहसे सबको डर लगता है.”
*हाच तो संभाजी….*
पुरे हिंदुस्थान के आलमगीर होना चाहते है हम… पण माझ्या ह्या महत्वाकांक्षेलाच यानं छेद दिला, बुढाप्यामध्ये जवान बनवला ह्या पोराने मला, ह्याची माणसं हि तशीच बेडर, धाडसी, पराक्रमी,
तो तो तो नाशिकचा किल्ला “रामशेज”…. किल्याच्या खाली माझी ३०-४० हजारांची फौज आणि किल्ल्यावर ह्याची अवघी ६०० माणसं, पण सहा वर्षे अजिंक्य ठेवला किल्ला त्यांनी, माणसाच्या हृदयात काय पेरतो हा कुणास ठाऊक??
मी इंग्रजांना ह्यांच्याविरुद्ध चिथावलं, पुर्तुगीझांना ह्यांच्याविरद्ध उभं केलं, सिद्धी ला ह्याच्या विरुद्ध लढायला प्रवृत्त केलं, पण सगळ्यांच्या उरावर पाय देऊन हा उभा राहिला, इंग्रजांना चारी मुंड्या चित केलं, पुर्तुगीझांची हाडे खिळखिळी केली, जंजिऱ्याच्या सिद्धीचा तर कंबरडंच मोडलं ह्याने, माझं कैक लाखाचं सैन्य, माझे नातलग, माझे शाहजादे ह्या सगळ्यांवर जबरदस्त जरब बसवली ह्याने, माझ्या सैन्याने तर आपण कुठे मरणार हे पण गृहीत धरलं होत.
मद्रास, पाषाणकोट, तंजावर, जंजिरा, प्रत्येक जागी हा आणि ह्याची माणसे आहेतच, जळी स्थळी काष्टी पाषाणी जणू हाच दिसत होता मला, कसल्या मिट्टीचा बनलाय हा??
औरंगजेब आसन सोडून उठला आणि त्या खुदाचे आभार मानायला जमिनीवरून गुडघे टेकून बसला….. “अय खुदा, आखीर तुने वो दिन दिखाया….. शुक्रगुजार है हम तेरे”
त्याच वेळी शंभूराजे कविराज कलशांना विचारते झाले, “काय कविराज ह्या अशा वेळी सुचतीय का एखादी कविता?”
आणि तत्क्षणी कविराज बोलते झाले…. “राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग”
याचा अर्थ असा : राजन काय लढलात आपण… काय तुमचं ते शौर्य…. तुमचा प्रताप पाहून हा औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर गुढघे टेकून बसलाय…..
आणि मग सुरु झालं अत्याचारांचा पाशवी खेळ, ४२ दिवस सतत, सलग,
क्षणाक्षणाला, भीमा-इंद्रायणी सुद्धा आसवं गळू लागल्या….
ह्या अत्याचारांच्या शृंखलेत एक दिवस असाही आला जेव्हा “मियाखान” ज्याच्या दोन्ही मुलींची लग्ने स्वतः संभाजीराजांनी स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली होती, तो आला… पाहिलं त्याने “मराठ्यांच्या राजाची झालेली दुरावस्था”, डोळे काढलेत, कान कापलेत, हातापायाची बोटे छाटलीत, रक्त….फक्त रक्त ठिबकतंय त्यातून… चामडी सोलून काढलीय पूर्णांगाची…. त्यावर बसणारे किडे, माश्या पहिल्या, त्यांचा होणार त्रास बोलून दाखवायला वाचाच राहिली नव्हती…. जीभ छाटली होती माझ्या राजाची….
तो मियाखान अशाही परिस्थितीत विचारता झाला शंभू राजांना, “राजं वाचवू का तुम्हाला?? घेऊन जातो तुमच्या स्वराज्यात…” आवाज ओळखीचा वाटला तशी शरीराची तगमग, तडफड सुरु झाली, हातपाय हलायला लागले, उठून बसायचा एक केविलवाणा प्रयत्न आणि तो हि सपशेल फसला…. सततचे अत्त्याचार सोसून जर्जर झालेला देह साथ देईनासा झाला…. आणि त्यांची अशी अवस्था पाहून पुन्हा मियाखान बोलला.. ” नको राजं…. नकोच….. तुम्हाला हा असा स्वराज्यात घेऊन गेलो तर तिथली रयत माझ्यावर छी थू करेल, मलाच मृत्यूच्या दाढेत लोटून देईल… विचारेल मला ज्याने तुझ्या मुलींची लग्ने स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली त्या… त्या आमच्या राजाची अशी अवस्था झाल्यावर त्याला आमच्याकडे घेऊन येताना तुला लाज नाही वाटली का?? नाहीत सहन होणार मला त्यांच्या आरोपांच्या फैरी…. त्यापेक्षा तुम्ही इथ मेलेलंच बरं….”
हे शब्द ऐकताच थरारला-शहारला छावा, साखळदंडांनी जखडलेल्या देहाला हिसके बसायला सुरुवात झाली…. त्यांच्या आवाजांनी त्या भयाण रात्रीची शांतता भंग पावली, चोरट्या पावलांनी शंभुराजांना भेटायला, पाहायला आलेला मियाखान मृत्यूच्या कराल दाढेत अडकल्यासारखा जागच्या जागीच थिजून थरथरायला लागला… मशाल विझली…. आणि त्यातून ऐकू येऊ लागला साखळदंडांचा संथ आवाज… काही वेळानंतर तो आवाजही थांबला….. संभ्याला काय झालं हे पाहायला आलेल्या एका पहारेकरी हशमाला तो रक्तात लोळागोळा होऊन पडलेला शंभूंचा देह हातातल्या मशालीच्या उजेडात दिसला…. तो पाहिल्यावर एक विषारी फुत्कार टाकून तिथे असलेली एक मशाल पेटवून तो हशम शंभूराजांपासून निघून गेला…
अंधारात लपून बसलेला मियाखान काही वेळानी बाहेर पडला…. मघाचा साखळदंडांचा आवाज त्याला राजापर्यंत यायला भाग पाडत होता…. तो आला… आला… जवळ आला… समोरच्या मशालीच्या उजेडात मघाची झालेली हालचाल कशासाठी होती हे शोधू लागला आणि तिथल्याच एका दगडी शिळेवर बोटं तुटल्या हाताने शंभूराजांनी लिहिलेले शब्द वाचून पुरता शहारला… ती वाक्ये होती “वाचवाच मला खांसाहेब, माझ्या नुसत्या जिवंत असण्यानेसुद्धा हा औरंगजेब बादशहा खंगून खंगून मारून जाईल…. वाचवाच मला खांसाहेब”
मरणाच्या दाढेत पडलेला असूनसुद्धा… अरे मृत्यू देहावर, विचारांवर थैमान घालत असताना सुद्धा फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी जगायची, रयतेसाठी लढायची, अशाही परिस्थितीत असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून पुरता भारावून गेला… एखाद्या लहान बाळासारखा मुसमुसून रडायला लागला…. अल्लाहकडे हात पसरून बोलायला लागला, “इन्सानियत का सच्चा वारीस आज तेरे करीब आ रहा है, उसपे अपनी रेहमात बरसा, तेरे जन्नत के दरवाजे इस पाकदिल इन्सान के लिये हमेशा खुले रख”….
अरे दुष्मनाच्या काळजात घर करून राहिलेला… दुश्मन ज्याच्या अफाट ताकदीचा चाहता झाला… त्या…. त्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीला, दस्तुरखुद्द छात्रपती शिवरायांच्या छाव्याला आमच्या स्वकीयांनीच रेखाटताना
खूप वेगळा रेखाटला….
आम्हाला संभाजी सांगितला ना…
पण तो सांगितला असा…
संभाजी म्हणजे व्यसनी, बदफैली, रगेल आणि रंगेल, आणि तेवढाच संभाजी आम्ही लक्षात ठेवून त्याच बलिदान मात्र सोयीस्कररीत्या विसरून गेलो..
९ वर्षे… सलग ९ वर्षे… इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्धी, मोघल अशा एक नाही तब्बल बारा बारा आघाड्यांवर स्वराज्यासाठी दुश्मनांची ससेहोलपट करणारा संभाजी आम्हाला कुणी सांगितलाच नाही…
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला, सातसतक, नायिका भेद, नखशिखा, बुधभुषणंकार झालेला नृपशंभो आम्हाला कुणीच नाही दाखवला,
दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करून सरकारातून पैसे आणि बी-बियाणं पुरवून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार देणारा जाणता राजा नाही सांगितला…
तब्बल १४० लढाया करून एकही लढाईत पराभूत न झालेला रणमर्द सर्जा संभाजी आम्हाला कळूच दिला नाही कुणी…
स्वतःच्या बायकोला “स्त्री सखी राज्ञी जयती” असा ‘किताब देऊन तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीला उघड आव्हान देत स्त्री पुरुष समानतेचं मूळ धरून मुलखीं कारभार सोपवणारा द्रष्टा सुधारक कधी सांगितलाच नाही आम्हाला….
वडिलांच्या स्वराज्यमंदिरावर स्वतःच्या प्राणांची आहुती देत कळस चढवणारा, “पुत्र व्हावा ऎसा गुंडा-ज्याचा तिन्ही लोकी झेंडा” ह्या तुकोबारायांच्या पंक्तीला पुरून उरलेला सज्ञान कर्ता पुत्र नाही सांगितला…
भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाफ ठरलेली पंढरपूरची वारी आणि संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर आदी विभूतींच्या पालख्या सुरु करून त्यांना सरकारातून खर्च आणि संरक्षण देणारा संस्कृती पुरस्कर्ता नाहीच दाखवला..
रामशेज सारखा सगळ्यात कमी उंचीचा पठारी किल्ला सतत सहा वर्षे कमी मनुष्यबळावर झुंझवता ठेवणारा झुंझार रणमर्द नाही दाखवला….
रयतेला छळणाऱ्या सिद्धीला समुद्रात बुडवायचा चंग बांधून ८०० मीटर लांबीचा समुद्रात भराव टाकून पूल बांधणारा इंजिनियर नाहीच सांगितला…
राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे माफ करून वडिलधाऱ्यांचा मान आणि इज्जत अबाधित ठेवणारा एक मानी संस्कारी राजा नाही सांगितला कुणी…
बाणांच्या वर्षावात मनुष्यहानी होऊ नये म्हणून जनावरांच्या कातडीची जॅकेट तयार करून सैन्याची काळजी वाहणारा रणमर्द झुंजार नाही दाखवला….
मराठ्यांच्या स्वराज्याचा दुसरा छत्रपती, धाकलं धनी संभाजी महाराज….
ज्याचा जवळचा मित्र रायाप्पा एक “महार”,
ज्याला सोडवायला तयार झालेला मियाखान एक “मुसलमान”,
आपल्या धन्याच्या मरणाची वाट आपण शत्रूला दाखवली म्हणून १०-१२ वर्षांच्या वयात पश्चात्ताप करत शत्रुलाटेवर तुटून पडत त्यांच्या छावणीतले डेरेदांडे जाळत मृत्यू जवळ करणारी ती आठ पोरं “धनगर”,
मलकापुरात दहा हजाराची राखीव आणि अजिंक्य फौज तयार करून देणारा, कवी आणि कवित्व जपतानाच राजधानी रायगडावर आलेलं शत्रू वावटळीची शेंडीला गाठ मारून धूळधाण उडवणारा… राजाचा श्वास जणू असा कविराज कलश एक “ब्राम्हण”,
“#ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो?? आणि #मराठा म्हणून कोण पाठी घालतो”?? अशी कणखर भूमिका ठेवणारा द्रष्टा व बहुजनवादी राजा म्हणजेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती… धाकलं धनी…. महाराज… रणमर्द झुंजार… छावा….
सर्जा संभाजी छत्रपती.. सोडून गेली माता जेव्हा तो दोन वर्षाचा होता  नव्हते जेव्हा पिता जगात तो २१ वर्षाचा होता  वनातल्या वनराजासम तो वादळाशी लढला नेले जेव्हा मृत्यूने तो ३२ वर्षाचा होता  त्याला आई लहानपणी सोडून गेली पिता तरूणपणात सोडून गेला नातेवाईक विरोधात गेले जवळचे संकटात सोडून गेले तरीही  तो लढला त्याच्यावर विषप्रयोग झाले त्याची बदनामी झाली तरीही तो लढला दहा दिशांनी दहा संकटे आली कोणी उरला नाही वाली तरीही तो लढला अस असताना ही त्याने ४ग्रंथ लिहिले अनेक भाषा शिकला ज्ञान मिळवले. ज्याने मैत्री अशी केली कि मिञाने त्याच्यासाठी जीव दिला शञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेला त्याने कतृत्व असे केले कि सुर्य चंद्र संपतील हा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिला कोण होता तो नरवीर शुरवीर धर्मवीर ज्ञानवीर गुणवीर तो होता शिवरायांचा छावा
*देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था….*
*महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था..*



औरंगजेबाच्या आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का ???

औरंगजेबाचा वार्षिक महसुल त्या काळा मध्ये ३५० कोटी आहे आणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महसूल कसाबसा एक कोटी आहे. औरंगजेबाच्या फक्त सरदारांची संख्या साडे १४ हजार आहे आणी एका सरदाराच्या हाताखालीकमीत कमी ४०००० च सैन्य आहे. तर शिवाजी महाराजांच सैन्य कसंबसं फक्त ३५००० आहे.
मग हा एवढ्या बलाढ्य औरंगजेब स्वराज्याला का चिरडायला निघाला.हयात घालवली त्यानी. आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का???
तिकडं अफगानिस्थान तसाच आहे.
इरान तसंच आहे.
गोवळकोंड्याची कुतूबशाही तशीच आहे.
नगरची निजामशाही तशीच आहे.
विजापुरची आदिलशाही तशीच आहे.
ते घे ना. विजापुर ची आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, अफगानिस्थान घे. महाराषट्रच का ???
स्वराज्यच का ?
याचं उत्तर त्याच्या इतिहासकारांनी लिहुन ठेवलं आहे.
औरंगजेबने स्वत: लिहुन ठेवलेल आहे असं म्हणतात.
तो लिहितो
'इरानच राज्य शाहबाजच आहे.
अफगानिस्थानच राज्य मिरकुत्कुल आहे.
विजापुरचं राज्च आदिलशहाचां आहे.
गोवळकोंड्याच राज्य कुतुबशाहाच आहे.
नगरच राज्या निजामशाहाच आहे.
पण शिवाजींच स्वराज्य हे कोणत्य राजा, सुलतान, सम्राट, बादशहाच नसुन हे लोकांच म्हणजे रयतेचं राज्य आहे.
आणी जिथ रयतेच राज्य असतं तिथे माणसं मरायला आणी मारायला मागे पुढे बघत नाही. आणी सगळ्यात मोठा धोका आहे तो हा.'
औरंगजेबानी जणु स्वराज्याच्या यशसवितेच गणित मांडल.
हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचे तख्त ही वाचणार नाही हे औरंगजेबाला कळुन चुकलं होतं.
आणी हे खरंच आहे. तो बुंदेलखंडाचाछत् ­रसाल बुंदेला औरंगजेबाची नौकरी सोडुन महाराजांकडे आला आणीम्हणाला की त्याला महाराजांच्या सौन्यात सामील व्हायचए. महाराजांनी नकार दिला आणी त्यालासमजवलं की जसं त्यांनी इथे स्वराज्य स्थापन केलं तसं त्यानेबुंदेलखंडत करावं. आणी तो छत्रसाल बुंदेला महाराजांकडुन प्रेरना घेऊन गेला आणी त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलं. हे बघुन औरंगजेबाला कळाल होतं की सगळ्यात मोठा धोका म्हणजे हा स्वाराज्याचा प्रयोग.


Saturday 10 March 2018

महाराजांचे सुवर्ण सिंहासन......weight of golden throne of shivaji maharaj during the coronation ceremony.

राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांसाठी खास ३२ मण वज.नाचेसोन्याचे तयार करण्यात आले होते. हे सिंहासन पोलादपुर (जि. रायगढ) येथीलरामजी दत्तो चित्रे यांनी घडवले होते. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणितनवरत्ने जड्वलेली होती.आज सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.२४ tole म्हणजे १ शेर (जुना तोला सध्याच्या ११.७५ ग्रामचा होता)१६ शेर म्हणजे १ मणम्हणजेच१ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो)सन्दर्भ : शिवचरित्र (बाबासाहेब पुरंदरे)

रयतेचा राजा .....बहूजनांसी आधारू

शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचारछत्रपती शिवरायांनी रयतेला दिला। छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिकशेतकर्‍यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्‍यांचे हित जपणे हे तेआद्यकर्तव्य मानत. शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवबासर्वाधिक उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांना पुरस्कार देऊन गौरवित असत.अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्‍या शेतकर्‍यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणेपुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीरप्रमाणात आकारला जात असे.पडिक जमिनीची मशागत करणार्‍याशेतकर्‍यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे। दलालांची प्रथा तरछ‍त्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंनामहसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरुझाली.दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्‍यांना शेतसारा माफ करुनत्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्‍यांच्या भाजीच्यादेठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असेकडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्‍यांना काढले होते. शेतकर्‍यांचीआर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत राजेंचं होतं.म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले.

Friday 9 March 2018

छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. सनई चौघडे वाजले. नगारे, नौबती वाजल्या. तोफा झडल्या. इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी पुढे सरसावले आणि महाराजांची गारद देण्यात आली.
*आस्ते कदम*
*आस्ते कदम*
*आस्ते कदम*
*महाराsssssज*
*गडपती*
*गजअश्वपती*
*भूपती*
*प्रजापती*
*सुवर्णरत्नश्रीपती*
*अष्टवधानजागृत*
*अष्टप्रधानवेष्टित*
*न्यायालंकारमंडित*
*शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत*
*राजनितिधुरंधर*
*प्रौढप्रतापपुरंदर*
*क्षत्रियकुलावतंस*
*सिंहासनाधिश्वर*
*महाराजाधिराज*
*राजाशिवछत्रपती*
*महाराजांचा विजय असो.*


*गारद म्हणजे काय ?*


महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत *“गारद”* असे म्हटले जाते. गारदेला संस्कृतमध्ये *बिरुद* किंवा *बिरुदावली* तर ऊर्दु भाषेत *अल्काब* असे म्हणतात.
*गारद कोण देतात ?*
गारद देणाऱ्यांना गारदी म्हणतात.

*छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ*
*गडपती* – गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज.
*गजअश्वपती* – ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.)
*भूपती प्रजापती* – वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
*सुवर्णरत्नश्रीपती* – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.)
*अष्टावधानजागृत* – आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
*अष्टप्रधानवेष्टीत* – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
*न्यायालंकारमंडीत* – कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
*शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत* – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज.
*राजनितीधुरंधर* – आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.
*प्रौढप्रतापपुरंदर* – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
*क्षत्रियकुलावतंस* – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
*सिंहासनाधिश्वर* – जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.
*महाराजाधिराज* – विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
*राजाशिवछत्रपती* – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

महाराजांनी त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे सेनानी पराभूत केले त्यातले फक्त दोघेच भारतीय होते.
बाकी सगळे परकीय होते. त्यांच्या त्यांच्या देशाचे मानांकित सेनानी होते.....
शिवरायांनी पराभूत केलेले सेनानी पाहु - ज्याची लाल महालात बोटं छाटली
तो शाहिस्तेखान तो अबु-तालिबानचा नबाब,
तुर्कस्तानचा नबाब आहे.
तो प्रतिऔरंगजेब या नावाने ओळखला जायचा, औरंगजेबाचा सक्खा मामा आहे तो.
बंगाल प्रांत जिंकुन दिलाय त्याने.. असा बलाढ्य सेनानी महाराजांनी एका रात्रीत तीन बोट छाटली.... पहाट व्हायच्या आत गायब झाला तॊ पुन्हा नाही आला...
तो बहलोलखान पठाण सिकंदर चिडरखान पठाण हे सगळे पठाण अफगाणी आहेत. अफगाणीस्तानचे आहेत हे..
तो दिलेरखान.. मंगोलियन आहे तो, बाबा... मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योद्धा... महराजांनी त्याचा पराभव केला.
सिद्धि जौहर, सिद्धी सलाबत खान हे सगळे इराणी आहेत. इराण चे आहेत सर्वोत्तम योद्धे आहेत महाराजांनी त्यांचा पराभव केला.
आणि इथं लोणावळ्याच्या उंबरखिंडीत ज्याचा कोंडून पराभव केला...असा की गिनिज बुकला सुद्धा त्याची नोंद घ्यावी लागली की जगातल्या सगळ्यात कमी सैन्याने जास्तित जास्त सैन्याचा पराभव केला
( एक हजार विरुद्ध 30 हजार आणि 30 हजारंचा संपूर्ण पराभव 1000 मधला एकही मावळा न गमावता )
तो कहार्तलब खान तो उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताश्कंद रशियाचा आहे त्याचा पराभव केला.
इंग्रज-गवर्नर लिहितो की शिवाजी महाराज जर अजून 10 वर्षे जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तानचा नीट चेहरा पाहता सुध्दा आला नसता...
सतराव्या शतकात लंडन मध्ये 3 वृत्तपत्रे प्रकाशीत होत होती. त्यामध्ये लंडन गॅझेट नावाचं वृत्तपत्र होत . शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याहून निसटले त्यावेळी या लंडन गॅझेट मध्ये पहिल्या पानावर ती बातमी छापून आलेली. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ स्वराज्या असा नव्हता, किंग ऑफ मराठा असाही नव्हता.... तर त्यात माझ्या राजांचा उल्लेख
Shivaaji the king of India असा होता...
व्हियेतनाम नावाचे छोटसं राष्ट्र आहे हो राष्ट्रचं, आपल्या पुणे जिल्ह्याएवढेपण नसेल. व्हिएतनामचं आत्ताची महासत्ता अमेरिकेसोबत गेली 35 वर्षे युद्ध सुरू होते. पण या युध्दात अमेरिकेला विजय मिळाला नाही. का माहितीये कारण--
त्या व्हिएतनामच्या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.... त्या व्हिएतनामचा स्वातंत्र्यसेनानी "हू जी मीन" नांव त्याचे. त्याच्या समाधीवर लिहून ठेवलंय शिवाजी महाराजांचा एक मावळा येथे चीरविश्रांती घेतोय....
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या विषयावर 100 मार्काँचा पेपर घेतला जातो.
जगातली 112 राष्ट्र शिवरायांच्या गोरील्ला warfair (युधतंत्र) चा वापर आपल्या अभ्यासक्रमात करतात.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो.
मी म्हणालो आता तूच सांग सगळं जग शिवरायांचा अभ्यास करतंय तिथं माझ्या देशातल्या अभ्यासक्रमात किती वेळा शिवरायांचा उल्लेख आहे ?
तुम्ही इतिहास शिकलात त्या CBSC मध्ये 1700 पानांचे पुस्तक काढलंय. त्यात फक्त 4 ओळी आहेत शिवाजी महाराजां बद्दल म्हणून तुला ही माहिती नव्हती... म्हणुन तुम्ही असं म्हणालात...
औरंगजेबाने आयुष्यातीलं ऐन उमेदीची २७ वर्ष तब्बल.... हो २७ वर्ष या महाराष्ट्रात मराठ्यांशी निकाराची झुंज देण्यात वाया घालवली.
त्याने हिच २७ वर्ष इतर कुठल्याही ठिकाणी घालवली असती तर कदाचीत ही अर्धी पृथ्वी त्याच्या अधिपत्याखाली आली असती... इतक्या प्रचंड शक्तीशाली फौजेचा तो बादशाह होता पण मराठ्यांनी त्याला दिल्लीचे तख्त पुन्हा पाहु दिले नाही...
कारण अख्ख्या जगाला माहिती आहे..की छत्रपती शिवाजी महाराज काय होते. पण भारतातील लोकांनाच माहित नाही.....


Sunday 25 February 2018

ज्याचा दर्या ,त्याचे वैभव ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..

जंजिरा मिळाला नाही ,तरी त्यांची खंत करत न बसता दुसरा जंजिरा निर्माण करणाऱ्या त्या जिद्दीला राजे शिवराय स्मरण करावे.-

जिंजीरा भेटत नाही म्हणून खंत न करता ..आरमार चे महत्व ओळखून राजेंनी त्या काळी सिंधुदुर्ग ,विजयदुर्ग ,पद्म दुर्ग या सारखे आरमार उभे केले हि काय सोपी गोष्ट नाहीये.. असे खंबीर आरमार तयार केले कि जे पुढे अरबी समुद्रात इग्रजना हि भारी पडले .

राजे चे एक वाक्य

ज्याचा दर्या ,त्याचे वैभव

ज्याचे आरमार, त्याचा समुद्र ..

“व्यापार हवा ,वैभव हवे ,तर समुद्र ताब्यात हवा .ह्या सूत्र समजून त्यांनी आरमार स्थापन केले .हे सूत्र पुढे पेशवे, मराठे विसरले त्यामुळे इग्रजनी हिन्दुस्तान बळकावला आणि आज २६/११ सारखे मुंबईवर हल्ले..

मी जो फोटो upload केला आहे त्या वरील वाक्य वाचा ..अप्रतिम आहे.

राजे नी पद्मदुर्गवरून जंजिरा पाहून काढलेली त्या वेळची ती शब्द असावीत असे भासते...

Wednesday 21 February 2018

महाराष्ट्रा व्यतिरिक्त हे सर्व किल्ले मराठ्यांच्या अमला खाली होते...

महाराष्ट्रा व्यतिरिक्त हे सर्व किल्ले मराठ्यांच्या अमला खाली होते...


पाकिस्तान : ( N - S ) - अटक , लाहोर , मुलतान
पंजाब - हरयाणा - सिर्हिंद , सुनम , कुंजपुरा , दिल्ली
उत्तर प्रदेश - नाजीबाबाद , बिजनोर , अलीगड , झांसी , कालींजर ( बंडा )
बेंगाल - ओरिसा - बिश्नुपुर , शिब्पूर , बारबती , खोर्दा , बनपुर
विदर्भ - गाविलगड , नरनाळा , रातांपूर
मध्य प्रदेश - घ्वलिओर , मांडू , बऱ्हाणपूर ( अशेरी ) , गोहाड
राजस्थान - जालोर , तरागड ( अमेर ) , अलवार
गुजरात - दाभोई , भद्र किल्ला ( अमदावाद )
कर्नाटक - हुबळी , धारवाड , बेलगाम , सावनुर , बंकापुर , नरगुंद
आन्ध्र प्रदेश / तमिळ नाडू - घूर्रम्कोन्द ( kaddapa ) , जिंजी , वेल्लोर


शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...