Saturday 24 March 2018

पुरंदरच्या तह : ( शक्ती आणि युक्ती " हे राज्य व्हावें ही श्रींची इच्छा !"


पुरंदरच्या अभूतपूर्व लढ्यानंतर, पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झाराजे व शिवाजीमहाराज यांच्यात पांच कलमांचा तह झाला; तो शिवइतिहासात 'पुरंदरचा तह' म्हणून प्रसिध्द आहें. महाराजांनी आपल्या शत्रूंशी (स्वकीय व परकीय) अनेक तह केले; पण तें फारसे प्रसिध्द नाहीत व कोणाला त्या बद्दल फारशी माहितीहि नाही. पण पुरंदरचा तह मात्र प्रसिध्द झाला; कारण या तहामुळेच महाराजांच्या पराभवावर (व मिर्झाराजांच्या विजयावर) शिक्कांमोर्तब झाले, ... पण हें सत्य नव्हे !

पुरंदर तहातील जी पांच कलमे आहेत, ती सर्व दोषपूर्ण आहेत व त्यातील एकही कलम अर्थपूर्ण नाही, म्हणून त्याला 'पुरंदरचा पोकळ तह' म्हणायला हवे !!

पुरंदरचा पोकळ तह :

या प्रकरणांत आपण पुरंदरच्या पहिल्या व दुसऱ्या कलमांचा विचार करू या. दुसरे कलम सर्वात फसवे आहें.

आकड्यांचा खेळ :

महाराजांनी २३ किल्ले (म्हणजे ६६ %) व ४ लाख होन वसूलाचा मुलूख (म्हणजे ८० %) बादशहाला दिला, तर उरलेले १२ किल्ले व त्याखालील १ लाख होन वसूलाचा मुलूख त्यांच्याकडे राहीला.



पुरंदरच्या प्रसिध्द तहांतील कलमे पांच, ती पुढील प्रमाणे, --

१. पुरंदर, वज्रगड, कोंढाणा, खंडागळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भंडारदुर्ग, पळसखोल, रूपगड, बख्तगड, मोरबखन, माणिकगड, सरूपगड, साकरगड, मरकगड, अंकोला, सोनगड व मानगड हें तेवीस किल्ले व त्यांच्या अमलांतील चार लाख होनांचा मुलूख शिवाजीराजांनी बादशाहांच्या स्वाधीन करावा.

२. शिवाजीराजांनी फक्त बारा किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा त्यांखालील मुलूख यावर संतुष्ट राहावे. हा मुलूखहि केवळ बादशाही कृपेचा प्रसाद म्हणूनच त्यांच्याकडे राहू शकत आहे, हें लक्षात घेऊन त्यांनी बादशहांशी अत्यंत निष्ठेने वागावे.

३. शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे यांना बादशहांकडून पांच हजार स्वारांची मनसब मिळेल. पण संभाजीराजे लहान असल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून नेताजी पालकर यांनी दख्खनच्या सुभेदारापाशी चाकरीस राहावे



४. दख्खनचा शाही सुभेदार जेव्हा जेव्हा हुकूम करील तेव्हा तेव्हा शिवाजीराजांनी सुभेदाराच्या हुकूमाप्रमाणे कामगिऱ्या पार पाडाव्यात.

५. विजापूरकरांच्या अमलांतील तळ-कोंकणचा व बालेघाटावरचा मुलूख जिंकून घेतल्यानंतर शिवाजीराजांच्या ताब्यांतच ठेवण्यास बादशाहांची मंजुरी आहे. त्याबद्दल शिवाजीराजांनी दरसाल तीन लाख होनांच्या हप्त्याने एकूण चाळीस लाख होनांची पेशकश बादशाहांस द्यावी.

इतिहासकार सर सेतु माधवराव पगडी यांनी दिलेल्या माहितीनुसार जे बारा किल्ले महाराजांकडे राहिले, तें असें, ...

१. राजगड २. तोरणा ३. हिंगणगड ४. भोरप ५. तळेगड ६. महागड ७. घोसला ८. बिरवाडी ९. पाली १०. रायरी ११. कुंवारी गड १२. उदय दुर्ग (५१)

किल्ल्यांच्या बाबतीत मिर्झाराजांनी महाराजांशी वाटाघाटी केल्या, व अशाप्रकारे पुरंदरचा तह पार पडला. (दि. १३ जून पर्यंत) दि. १४ जून रोजी महाराज निघाले व दुपारी कोंढाण्यावर (सिंहगडावर) पोहोचले.कारण किल्ला त्यांना स्वत: मोंगलांच्यााब्यांत द्यायचा होता, शिवाय सिंहगडावर जिजाऊ आईसाहेब व इतर कुटुंबीय मंडळी होती. पुरंदरच्या तहाची हकीकत समजल्यावर आईसाहेबांना अतिशय आनंद झाला, कारण शिवबांनी पुरंदरचा तह करून रयतेचे संरक्षण केले होते, स्वराज्य वांचविले होतें. शिवाजीमहाराज 'गमावून' 'जिंकले' होतें ! महाराजांनी तलवारी ऐवजी बुद्धीने काम केले होतें ! सिंहगड ताब्यांत देऊन महाराज आईसाहेबांबरोबर व इतर कुटुंबीयासोबत गड उतरले. जिजाऊ आईसाहेबांना हें माहित होतें की, स्वराज्यरक्षणासाठी कोंढाणा तात्पुरता मोंगलांना द्यावा लागत आहे व संधी मिळताच तो परत घ्यायचा आहें, ... त्या गडाखाली उतरल्या, तों हा निर्धार करूनच !!


शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...