Wednesday 11 April 2018

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता...


हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी “जिंजी”.* संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात जिंजीचे महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु आज पूर्ण पणे विस्मृतीत गेले आहे. जिंजीचा हा किल्ला मद्रासच्या दक्षिणेला २५० किलोमीटर दूर तीरूअण्णामलई पर्वतराजीत येतो. शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये झाला आणि लगेच संपूर्ण दख्खन जिंकण्यासाठी औरंगजेब ५,००,०००/- सेना घेऊन दिल्लीतून निघाला. अत्याचाराची अघोरी मालिका आरंभ झाली.
दक्षिणेतली सारी राज्ये बुडवून एक छत्री मुगली सत्ता स्थापनेचा त्याचा उद्देश्य होता. मोगलांचे सैन्य हे त्याकाळच्या जगातले सर्वात मोठे सैन्य होते. घोडदळ व पायदळ मिळून एकूण ५ लाख सैन्य होते. अगणित हत्ती, तोफा व शास्त्रणाचा महापूरच जणू दक्षिणे वर लोटला.
पुढे संभाजी राजांना छळा बळाने ठार करण्यात आले हे तर सर्व ज्ञात आहेच. परंतु पुढे जो हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास लिहिला गेला तो दुर्दैवाने आज लुप्त पावला आहे. तो तेजस्वी इतिहास असा की….
औरंगी वरवंट्या खाली आदिलशाही आणि कुतुबशाही ही राज्ये बुडून नष्ट झाली, पण त्यांच्या पेक्षा सैन्यबळा मध्ये लहान असलेले हिंदवी स्वराज्य काही औरंग्या जिंकू शकला नाही. छत्रपतींच्या मृत्यू नंतर पुढची २७ वर्ष सतत मोगल सेनेला स्वराज्यने निकराची झुंज दिली, जे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य आहे कारण सतत २७ वर्ष युद्ध कोणत्याही राष्ट्राने आज वर लढलेले नाही ज्यामध्ये १ दिवस ही शांततेचा काळ नाही. शेवटी १७०७ मध्ये वैफल्यग्रस्त झालेला औरंगजेब मेला व स्वराज्याचा निर्णायक विजय झाला.
या २७ वर्षामध्ये (१६८० ते १७०७) संभाजी महाराजांच्या मृत्यू (१६८९) नंतरची १८ वर्ष तर फारच भीषण काळ घेऊन आली. जेव्हा राजाराम महाराज छत्रपती झाले. याच काळात रायगड पडून मोगलांच्या हाती लागला. रायगडा पासुन ते जिंजी पर्यंतचा प्रवास अत्यंत धोक्याचा होता. जागोजागी मोगल सेना पसरली होती. अशा परिस्थितीत राजाराम महाराजांना अनेक वीरांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन या प्रवासा मध्ये सहाय्य केले. आता स्वराज्याची राजधानी रायगड हून खोल दक्षिणेत जिंजीला हलविली.
हिंदवी स्वराज्याच्या अद्वितीय पराक्रमा मुळे जिंजी जगाच्या इतिहासात विख्यात झाले ते “ट्रोय ऑफ ईस्ट” (Troy Of East) म्हणुन. याचा अर्थ औरंगजेबाने प्रयत्नांची शर्थ केली तरी तो जिंजी वर मत करून स्वराज्य बुडवू शकला नाही...
रायरीचा डोंगरी जगदीश्र्वरासमोर ह्या काळ्या पत्थरीच्या समाधी खाली सह्याद्रीचे-ह्या महाराष्ट्र देशीचे सार्वभौम राजे शिवराय कायमचे विसावले आहेत........ अखंड भारतवर्षाचं शक्तीपीठ बनलीय ही समाधी ............ सर्व जातीय-सर्व भाषीय लोकांचं इमान या एका जागी एकवटलयं........ वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्यासाठी चेतवलेलं स्फुल्लिंग वयाच्या पन्नासाव्या वर्षीपर्यत वणवा बनून कित्त्येक निर्दयी राजवटी संपवून इथेच विश्रांतीला थांबलं........ महाराज कायमच्या विश्रांतीसाठी थांबले तरीही त्यांनी उभारलेलं स्वराज्य तसूभरही डळमळलं नाही ........ ही ताकदही महाराजांचीचं "त्यांनी प्रत्येक मावळ्याच्या अंतर एक एक शिवराय जागवला होता............ "शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.......... "सह्याद्रीच्या अंगा-खांद्यांवर संजीवक नजरेने मोक्याच्या जागा हेरून तिथे बुलंद गडकोट वसवली होती........"। महाराजाच्या नुसत्या स्मरणाने अंगावर भाले फुटतात हे आजही आपल्या अंतरात शिवराय जिवंत याचंच द्योतक आहे......


संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहिला...
ग्रंथाचे नाव — बुधभुषणम.
संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले :- नखशिख (नखशिखांत), नायिकाभेद, सातशातक...
.
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपतीनां साहिक्तिक आणि संस्कृत याची उत्तम माहिती होती. संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ, तर नायिकाभेद, नखशीख आणि सातसतक हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे:
संभाजी महाराजांनी शहाजी महाराजांचे संस्कृत मध्ये वर्णन...
.
• श्री गणेशाला नमन देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदापतनागम् |
भक्तविघ्नहनने धृतरत्नं तं नमामि भवबालकरत्नम् ||
मराठी मध्ये अर्थ :- देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या, द्रुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या, रत्ने धारण करणारा, शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो...
.
• कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः | जगतः पतिरंशतोवतापोः (तीर्णः) स शिवछत्रपतीजयत्यजेयः |
मराठी मध्ये अर्थ :- कलिकारुपी भुजंग घालीतो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास. तारण्या वसुधा अवतरला जगपाल, त्या शिवबाची विजयदुदंभी गर्जुदे खास...
.
• भृशत् बलान्वयसिन्धुसुधाकरः प्रथितकीर्त उदार पराक्रमः |
अभवत् अर्थकलासु विशारदो जगति शाहनृपः क्षितिवासवः ||
मराठी मध्ये अर्थ :- सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजीराजे होऊन गेले...




<

No comments:

Post a Comment

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता.

शंभू महाराजरूपी प्रती शिवराय घडवला होता... हिंदवी स्वराज्याचा दुसरी राजधानी व मराठ्यांच्या (हिंदुंच्या) पराक्रमी इतिहासाची जिवंत साक्षी...